Tue, Apr 23, 2019 01:51होमपेज › Pune › आता बसमध्येसुद्धा पोलिस तैनात

आता बसमध्येसुद्धा पोलिस तैनात

Published On: Dec 23 2017 2:31AM | Last Updated: Dec 23 2017 1:54AM

बुकमार्क करा

वाकड : संतोष शिंदे 

बस मध्ये होणार्‍या चोरीच्या वाढत्या प्रकरांवर अंकुश ठेवण्यासाठी पुणे पोलिसांनी बस मध्ये पोलीस तैनात करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार वाकड पोलिसांनी बसमध्ये कर्मचारी तैनात करून बस पेट्रोलिंग सुरू केल्याचे पहावयास मिळत आहे.  नुकतेच काही दिवसांपूर्वी वाकड पोलिसांच्या तपास पथकाने बस मध्ये चोरी कारणांच्या विवध गुन्ह्यात वॉन्टेड असलेल्या महिलेस मोठ्या शिताफीने अटक केली. त्या आरोपी महिलेकडे तपास करीत असताना संपूर्ण शहरभर असे एक रॅकेटच कार्यरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.  

या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिस खात्यातील वरिष्ठ पातळीवरून बस पेट्रोलिंग करण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.  पोलिसांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कवतुक केले जात असून विशेषतः महिलांच्या सुरक्षेसाठी देखील हे एक महत्वाचे पाऊल असल्याचे बोलले जाते.  या उपक्रमामुळे बसने प्रवास करणार्‍या महाविद्यालयीन तरुणींना देखील सुरक्षा मिळणार असून चोरीच्या गुन्ह्यांबरोबरच बसमध्ये घडणार्‍या इतरही गैर आळा बसणार आहे.