होमपेज › Pune › कार ट्रकवर आदळली; दोन जणांचा मृत्यू

कार ट्रकवर आदळली; दोन जणांचा मृत्यू

Published On: Jun 20 2018 1:15AM | Last Updated: Jun 20 2018 12:25AMवाकड :  वार्ताहर

रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर कार आदळल्याने दोघांचा मृत्यू झाला. ही घटना मुंबई-बंगलोर महामार्गावरील पुनावळे येथे मंगळवारी मध्यरात्री एकच्या सुमारास घडली.अभिषेक मनोज माने (वय 19) आणि समीर अष्पाक शेख (वय 28, दोघेही रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) अशी अपघातात मृत्यू पावलेल्या तरुणाची नावे आहेत.  याप्रकरणी ट्रकचालक राहुल बंडू अंबोधरे (वय 30, रा. सोलापूर) यास पोलिसांनी अटक  केले  असून तरुणांच्या मृत्यूस कारणीभूत झाल्या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 हिंजवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुनावळे येथे मुंबईकडे जाणार्‍या महामार्गावर रस्त्याच्या कडेला एक ट्रक थांबला होता. पाठीमागून कारमध्ये आलेल्या दोन तरुणांना ट्रक थांबल्याचा अंदाज न आल्याने  भरधाव कार ट्रकला धडकली. यामध्ये अभिषेक माने आणि समिर शेख हे दोघेही  हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र  उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. हिंजवडी पोलिस तपास करीत आहेत.