Thu, Apr 25, 2019 05:32होमपेज › Pune › हिंजवडीत म्हातोबा महाराजांच्या उत्‍सवाची लगबग

हिंजवडीत म्हातोबा महाराजांच्या उत्‍सवाची लगबग

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

वाकड : वार्ताहर 

बगाड मिरवणुकीमुळे जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या म्हातोबा महाराजांचा उत्सव येत्या चैत्र पौर्णिमेला साजरा होत आहे. या उत्सवाची हिंजवडीसह पंचक्रोशीत जोरदार तयारी सुरू झाली असून बगडासाठी लागणारे लाकूड आणण्यासाठी शेलेकरी आज रवाना झाले आहेत. 

तालुक्यात सर्वात मोठा उत्सव मानला जाणारा म्हातोबा महाराजांचा उत्सव येत्या शनिवारी ( दि.31) साजरा होत आहे. म्हातोबा महाराजांच्या दर्शनसाठी भाविक हजारोंच्या संख्यने हिंजवडीत दाखल होतात. बगाड मिरवणूक या उत्सवाचे प्रमुख आकर्षण आहे. या मिरवणुकीत गावातील जांभुळकर घराण्यातील एका सदस्याची गळकरी म्हणून निवड केली जाते. त्या सदस्यांच्या पाठीला गळ टोचून गोलाकार फिरवले जाते. हे बगाड पूर्णपणे लाकडापासून तयार केले जाते त्यासाठी लागणारे लाकूड हिंजवडी पासून दीडशे किलोमीटर दूर बारपे गावाच्या जंगलातून आणावे लागते. या जंगलात म्हतोबा महाराजांचे मूळ ठाणे असल्याचे मानले जाते. त्या ठिकाणी विधीवत पूजा करून शेलेकरी लाकूड घेऊन येतात. उत्सवाच्या एक दिवस आधी हे लाकूड बगडावर चढवले जाते. सलग पाच दिवस पायी प्रवास करून लाकूड आणण्याची ही प्रथा आहे.


  •