Tue, Apr 23, 2019 13:36होमपेज › Pune › शहराला प्राणी संगोपन केंद्राची प्रतीक्षा

शहराला प्राणी संगोपन केंद्राची प्रतीक्षा

Published On: Dec 07 2017 1:24AM | Last Updated: Dec 07 2017 12:14AM

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी

शहरातील नागरिकांना सध्या येता-जाता मोकाट जनावरांचा त्रास होत असून, दिवसेंदिवस ही समस्या त्रासदायक ठरत आहे. शहराच्या विविध भागात बेवारस प्राण्यांचा त्रास होत असून, या प्राण्यांमुळे अपघातांत वाढ झाली आहे. दिवसेंदिवस मोकाट कुत्री व डुकरांमुळे नागरिक त्रस्त झाले असून, शहरात आता तरी प्राणी संगोपन केंद्र उभारणार का, असा सवाल नागरिक करत आहेत. 

शहरात; तसेच उपनगरांमध्ये भटक्या कुत्र्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढतच आहे; तसेच डुकरांनी आजवर अनेकांना चावा घेतल्याचा घटना घडल्या आहेत. याबाबत वारंवार तक्रारी करण्यात आल्या असून, याकडे साफ दुर्लक्ष केेले जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. याबाबत जून 2017 मध्ये बैठक झाली होती; परंतु आज सहा महिने उलटून गेले, तरी महापालिकेच्या वतीने काही ठोस पावले उचलण्यात आली नाहीत.

शहरातील नागरिकांना मोकाट जनावरांचा त्रास कमी न होता वाढतच आहे. संगोपन केंद्र उभारण्यासाठी पुणे जिल्हा नियोजन समितीने एप्रिल महिन्यात पालिकेला 35 लाख रुपयांचा निधी दिला आहे. याबाबत अनेकदा बेैठका झाल्या; परंतु अद्याप काम पूर्ण झाले नाही. आज सहा महिने उलटून गेले,  तरी हा प्रश्‍न मार्गी लागला नसल्याने पालिकेला मिळालेल्या निधी नेमका गेला कुठे, अशी विचारणा सुजाण नागरिकांनी केली आहे.