Tue, Jul 16, 2019 13:37होमपेज › Pune › वाघेश्वर उद्यान वाघोलीकरांसाठी पर्वणी

वाघेश्वर उद्यान वाघोलीकरांसाठी पर्वणी

Published On: Apr 19 2018 1:36AM | Last Updated: Apr 19 2018 12:30AMवाघोली : वार्ताहर

वाघोली येथे नगर महामार्गालगत सुमारे अडीच एकर जागेत वाघेश्वर उद्यान आहे. वाघोली व परिसरातील हे पहिलेच उद्यान असल्यामुळे सकाळी व सायंकाळी लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. रामभाऊ दाभाडे यांच्या पुढाकाराने व पाठपुराव्याने लोकवर्गणीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून 2014 अतिशय सुंदर वाघेश्वर उद्यान साकारण्यात आले आहे. ग्रामपंचायत, लोकवर्गणी व सरकारी निधीतुन हे उद्यान साकारण्यात आले आहे. तीन लॉन, दोन जॉगिंग पार्क, चिल्ड्रन प्ले एरिया, मेडीटेशन सेंटर, जेष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र जागा, खुली जिम (ओपन जिम) अशा सुविधा असलेले हे उद्यान आहे. या उद्यानात विविध प्रकारची रंगबेरंगी मन मोहून घेणारी फुलांची झाडे, हिरवागार गालीचा आदि सुविधांमुळे नागरीकांना मोहित करणार्‍या वाघेश्वर उद्यानामुळे वाघोलीच्या वैभवात भर पडली आहे.

वाढत्या नागरीकरणामुळे विविध व्यावसायिकांचा कल वाघोलीकडे आहे. लोकसंख्येबरोबरच वाढते गृहप्रकल्प व्यवसाय देखील मोठ्याप्रमाणावर वाढले आहेत. वाघोली येथे अनेक शाळा, विविध महाविद्यालये, हॉटेल्स, चारचाकी - दुचाकी वाहनांचे शोरूम्स, हॉस्पिटल्स आदि सर्व सुविधा नागरिकांना मिळत असल्यातरी विरुंगळ्यासाठी मात्र उद्यान नव्हते. जेष्ठ नागरिक, लहान मुले, कंपनीमध्ये काम करणारे अधिकारी, कर्मचारीवर्ग यांना विरुंगळ्यासाठी वाघोली व परिसरात कुठलीही व्यवस्था नव्हती. त्यामुळे रामभाऊ दाभाडे उपसरपंच असतांना त्यांनी पुढाकार घेऊन लोकवर्गणीतून अतिशय सुंदर अशी उद्यानाची निर्मिती केली. दाभाडे यांच्या कल्पनेतून साकारले गेलेले पुणे - नगर या महामार्गावर वाघेश्वर मंदिरासमोर सुमारे अडीच एकर जागेत उद्यान असून वाघोली व परिसरातील हे पहिलेच उद्यान असल्यामुळे सकाळी व सायंकाळी लहान मुळे, जेष्ठ नागरिक याची मोठी गर्दी पाहायला मिळते.

अतिरिक्त पाणी : वाघोली पाणी योजनेच्या शुध्दीकरण प्रकल्पा शेजारीच हे उद्यान असल्यामुळे  अशुध्द पाण्याचा वापर उद्यानासाठी करता येते. यापूर्वी वाघेश्वर मंदीर परीसरात असलेले लॅानच वाघोलीकारांसाठी उद्यान होते. मुलाना खेळण्यासाठी तेथे पुरेशी जागा नसल्याने त्यांची निराशा होत होती. मात्र या उद्यानामुळे मुले, जेष्ठ नागरीक यांना एक पर्वणीच मिळाली आहे.

वायफाय सुविधा : वाघोली येथे उभारण्यात आलेले उद्यान पुणे - नगर महामार्गालगत आहे. उद्यानामध्ये वायफाय सुविधा, समोर वाहनांसाठी पार्किंग, उद्यानाच्या देखभाल करण्यासाठी कर्मचारीवर्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे सुंदर आणि स्वच्छ असलेल्या उद्यानात विरुंगळ्यासाठी परिसरातील नागरिक येतात. मात्र सध्या वाय फाय सुविधा बंद पडलेली दिसून येते.

रोजगार : उद्याना जवळच वाघेश्वर मंदिर, मज्जीद अशी दोन धार्मिक ठिकाणे असल्यामुळे  नागरिकांची सकाळ व सायंकाळी सारखी वर्दळ असते त्यामुळे अनेक आपल्या छोट्याशा व्यवसायातून उपजीविकेचे साधन मिळाले आहे.