Sun, Aug 25, 2019 04:14होमपेज › Pune › आरोग्य केंद्रातील रिक्त पदे भरणार

आरोग्य केंद्रातील रिक्त पदे भरणार

Published On: Feb 04 2018 1:56AM | Last Updated: Feb 03 2018 11:32PMवाघोली : वार्ताहर

वाघोलीचे ‘आरोग्यकेंद्र आजारी पडण्याच्या मार्गावर’ या मथळ्याखाली दैनिक पुढारीने  सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. या वृताची शिरूर-हवेलीचे आमदार बाबुराव पाचर्णे यांनी दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना तात्काळ वैद्यकीय रिक्त पदे भरण्याची मागणी केली. जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी लवकरच रिक्तपदे भरणार असल्याचे आश्वासन दिले असल्याचे पाचर्णे यांनी ‘दै. पुढारी’शी बोलताना सांगितले.       

वाढते रुग्णांचे प्रमाण आणि रिक्त जागांमुळे कर्मचार्‍यांवर प्रचंड ताण येत असून सातत्याने रुग्णांमध्ये आणि कर्मचार्‍यांमध्ये वादावादीचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे रिक्त जागा भराव्यात अशी मागणी संदीप सातव यांनी केली होती. ‘दैनिक पुढारी’ने प्राथमिक आरोग्य केंद्र वाघोली बाबत सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. या वृताची दखल घेत आमदार पाचर्णे यांनी संपूर्ण मतदारसंघातील जिल्हापरिषद आरोग्य केंद्रातील रिक्त पदे भरण्याची मागणी मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली होती. 

वाघोली, लोणीकाळभोर, पेरणे वाडेबोल्हाई, उरुळीकांचन, कुंजीरवाडी, निमोणे, मांडवगण फराटा, तळेगाव ढमढेरे, रांजणगाव गणपती या आरोग्य केंद्रासह तालुक्यातील उपकेंद्रात वैद्यकीय अधिकार्‍यांसह विविध कर्मच्यार्‍यांची पदे रिक्त आहेत.  विशेषतः वाघोली व लोणीकाळभोर ही उपनगरे झपाट्याने वाढत असून येथील आरोग्य केंद्रामधील वाढत्या रुग्णांच्या संख्येमुळे अपुरा कर्मचारीसंख्या असल्यामुळे वैद्यकीय सेवा देताना त्यांच्यावर प्रचंड ताण येत आहे. त्यामुळे येथील रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावी, अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.