Sun, Feb 17, 2019 07:12होमपेज › Pune › तणावामुळे पोलिसांच्या आरोग्यावर परिणाम

तणावामुळे पोलिसांच्या आरोग्यावर परिणाम

Published On: Jan 24 2018 1:48AM | Last Updated: Jan 24 2018 12:56AMवाघोली : वार्ताहर

कायदा सुव्यवस्थेचे आरोग्य सांभाळणा-या पोलिसांचेच आरोग्य ढासाळले असून मधुमेह, रक्तदाब, सांधेदुखी, डोळ्याचे आजार याशिवाय पोटदुखी बरोबरच गंभीर आजाराने त्रस्त झाले असल्याचे दिसून येत आहे. अतिरिक्त कामाचा ताण आणि जडलेले आजार यामुळे त्यांची मानसिकता ढासळल्यामुळे व्यसनाधीनतेकडे वळण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्वसामान्यांपासून ते महत्वाच्या - अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेतेची जवाबदारी सांभाळत असतांना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे कर्मचार्‍यांसह अधिकार्‍यांच्याही आरोग्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे. दिवसेंदिवस वाढते मोर्चे, राजकीय सभा, गंभीर गुन्हे, वाहतूक कोंडी, अतिमहत्वाच्या व्यक्तीची सुरक्षा आदि बाबी सांभाळत पोलिसांना सोळा तासाहून अधिक काम करावे लागत आहे.

अनेकवेळा एकाचा ठिकाणी तासंतास उभे राहून कर्तव्य बजावतांना सांधेदुखी सारख्या आजारांना सोमोरे जावे लागत आहे. त्याचबरोबर वरिष्ठांचे प्रेशर आदि बाबीमुळे कुटुंबांना सुद्धा वेळ देता येत नसल्याने मानसिक तणावाखाली वावरतांना पोलीस कर्मचारी दिसून येतात.  अधिक तास उभे राहून करावे लागणारे काम, कामाचे अनिश्‍चित तास यामुळे उच्च रक्तदाब, मणक्याचे आजार अशा अनेक व्याधीने त्रस्त झाले आहेत. अनेक पोलीस स्टेशनमध्ये कॅन्टीन नसल्यामुळे किंवा कर्तव्य बजावत असणार्‍या ठीकांनी जेवणाची व्यवस्था नसल्यामुळे खाण्यापिण्यावर अनियमितता येते असल्यामुळे त्यांच्या जीवन शैलीवर परिमाण होते आहे. पोलीस स्टेशनमध्ये संगणकावर काम करणार्‍या कर्मचारी यांच्या काचबिंदू, मोतीबिंदू यासारखी आजार जडत आहेत.