Sat, Jan 19, 2019 11:39होमपेज › Pune › मेट्रोसह वाघोली बस डेपोचा प्रश्‍न मार्गी

मेट्रोसह वाघोली बस डेपोचा प्रश्‍न मार्गी

Published On: Aug 21 2018 1:38AM | Last Updated: Aug 21 2018 12:46AMपुणे : प्रतिनिधी  

महत्त्वाकांक्षी नागरी परिवहन प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आलेल्या आणि देशातील पहिला सार्वजनिक खासगी भागीदारी पद्धतीने राबविण्यात येणार्‍या, पुणे येथील हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोसह, वाघोली बस डेपो, पंतप्रधान आवास योजनेच्या प्रकल्पास गती देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे.

मंत्रालयात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची बैठक झाली. या बैठकीत मेट्रो प्रकल्पाच्या प्रगतीवर चर्चा करण्यात आली. पुणे मेट्रो लाईन- 3 प्रकल्प हा सार्वजनिक वाहतुकीचा व हिंजवडी येथील माहिती व तंत्रज्ञान क्षेत्राला चालना देणारा प्रकल्प आहे. या प्रकल्पाची किंमत 8313 कोटी रुपयांच्या घरात आहे. टाटा सिमेन्स या कंपनीने मेट्रोसाठी निविदा भरलेली आहे. ती पात्र ठरली आहे. हा प्रकल्प सार्वजनिक खासगी भागीदारी पद्धतीने राबविला जाणार आहे. या निविदेच्या अटी व शर्तींवर चर्चा होऊन मंजुरीसाठी कार्यकारी सामितीकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून वाघोलीत बस डेपो निर्माण करण्यासाठी प्राधिकरणाच्या जमीन संचयातील मौजे वाघोली 1458 व इतर क्षेत्र 17686 चौ. मी. सुविधा भूखंड, दीर्घ मुदतीच्या भाडेपट्ट्याने पुणे महानगर परिवहन महामंडळासाठी उपलब्ध करून देण्यास प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे.