Thu, Jan 24, 2019 06:14होमपेज › Pune › ‘मी राज्याचा मंत्री, केंद्राचा नाही’ (Video)

‘मी राज्याचा मंत्री, केंद्राचा नाही’ (Video)

Published On: Jan 20 2018 8:03AM | Last Updated: Jan 20 2018 10:10AMपुणे : प्रतिनिधी

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून मी प्रयत्नशील, आग्रही आहे. त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न केले आहेत. आता हा प्रस्ताव केंद्राकडे आहे. यासंदर्भात तमिळनाडू कोर्टात याचिका होती तिचाही निर्णय झाला.  आता केंद्रीय कॅबिनेट निर्णय करेल. यासंदर्भातील निर्णय केंद्राकडूनच केले जातील, मी राज्याचा मंत्री आहे केंद्राचा नाही, असे म्हणत अभिजात मराठीचा चेंडू तावडेंनी केंद्राच्या कोर्टात टोलावत हात वर केले.

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, आरटीई अंतर्गत प्रवेश नाकारला तर शाळांवर कारवाई होणारच. ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमुळे आत्तापर्यंत शाळा विविध कारणे सांगून  सुटका करून घेत होत्या. आता सॉफ्टवेअर अपडेट केल्यामुळे शाळांची सुटका नाही. प्रवेश नाकारला आणि दिला तरी शाळांना याची ऑनलाईन पावती द्यावी लागेल.

कृषी अभियांत्रिकी पदवीकरता सीईटीचा निर्णय घेतला आहे. त्याचा विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल. त्यांचे नुकसान होणार नाही. तसेच पद्मावत चित्रपटासंदर्भात सेन्सॉरने संमती दिल्यामुळे हरकत घ्यायचे काही कारण नाही. यादरम्यान कोणत्या चित्रपट गृहामध्ये चित्रपट प्रदर्शित होत असताना अनुचित प्रकार घडत असेल तर चित्रपट गृहाला सुरक्षा पुरविली जाईल