Sun, Dec 16, 2018 21:43होमपेज › Pune › नऊ गावे समाविष्ट करण्यास पिंपरी महापालिकेची मंजुरी

नऊ गावे समाविष्ट करण्यास पिंपरी महापालिकेची मंजुरी

Published On: Feb 06 2018 1:54AM | Last Updated: Feb 06 2018 1:49AMपिंपरी : प्रतिनिधी 

हिंजवडी, माण, मारुंजी, नेरे, जांबे, सांगवडे, गहुंजे आणि तीर्थक्षेत्र देहूगाव, विठ्ठलनगर ही नऊ गावे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत समाविष्ट करण्यास सर्वसाधारण सभेने उपसूचनेसह मंजुरी दिली. सध्याच्या  समाविष्ट गावांना महापालिका चांगल्या प्रकारे सुविधा पुरवू शकत नाही. नव्याने गावे समाविष्ट केल्याने समस्या अधिक गंभीर होणार आहेत. तिथे बकाल वस्ती होण्याची भीती व्यक्त करीत राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने या प्रस्तावाला विरोध नोंदविला. 

हिंजवडी, जांभे, माण, मारुंजी, नेरे, गहुंजे व सांगवडे ही सात गावे; तसेच महापालिका हद्दीच्या उत्तरेकडील इंद्रायणी नदीच्या नैसर्गिक हद्दीपर्यंतच्या देहूगाव, विठ्ठलनगर या गावांचे देहूरोड कॅन्टोन्मेंट क्षेत्र सोडून उर्वरित क्षेत्र महापालिका हद्दीत समावेशाचा प्रस्ताव आयुक्तांनी मांडला होता.  कामे तत्काळ व्हावीत

समाविष्ट गावांतील विकासावरून प्रशासन खेळ करीत आहे. नगरसेवकांनी पक्षभेद बाजूला ठेवून महापालिकेत विश्‍वस्त म्हणून काम केल्यास सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होणार नाहीत; मात्र प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे रहाटणी, काळेवाडी, रुपीनगर, वाल्हेकरवाडी येथे बेसुमार अनधिकृत बांधकामे उभी राहून तो परिसर बकाल झाला आहे. नव्या गावांचीही स्थिती तशी होऊ नये, असा मुद्दा राष्ट्रवादीचे भाऊसाहेब भोईर यांनी मांडला.