Sat, Feb 16, 2019 19:34होमपेज › Pune › एमएनजीएलच्या वायुवाहिन्या मागणी नसल्याने रिकाम्या

एमएनजीएलच्या वायुवाहिन्या मागणी नसल्याने रिकाम्या

Published On: Jan 20 2018 1:41AM | Last Updated: Jan 20 2018 12:49AMपुणे : नेहा सराफ 

मागणी तिथे पुरवठा या सूत्रानुसार न गेल्याने शहरात अनेक ठिकाणी महाराष्ट्र नॅचरल गॅसतर्फे  वायू वाहिन्या टाकून ठेवल्या असल्या तरी पुणेकरांनी त्यासाठी मागणी न केल्याने निम्म्याहून अधिक ठिकाणी वायुवाहिन्या रिकाम्या राहिल्या आहेत. 

तीन वर्षांपासून शहारातील विविध भागात नैसर्गिक वायूचे वहन करणार्‍या वाहिन्यांचे काम जोरदार सुरु आहे. तीन वर्षात पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्र मिळून सुमारे 260 किलोमीटर खोदाई पूर्ण झाली आहे. आता उर्वरित 300 किलोमीटर खोदाई करण्याचे काम एमएनजीएल येत्या काही दिवसात करणार आहे. मात्र सध्या टाकण्यात आलेल्या वाहिन्यांमधून सुमारे 82 हजार घरांना वायूपुरवठा होत असून जवळपास एक लाख 25 हजार घरांना पुरतील इतकी जोडणी करूनही मागणी नसल्याने पुरवठा होऊ शकत नाहीत.

याबाबत हळूहळू जनजागृती होत असून मार्च 2017 ला 50 हजार असणारी ग्राहक संख्या जानेवारी 2018 मध्ये 82 हजारांवर गेली आहे. ही वाढ आशादायी असली तरी अजूनही सव्वा लाख कनेक्शन मागणीच्या अभावाने पडून आहेत. याबाबत ग्राहकांशी संपर्क सुरु अनेकजण वाहिनीने वायू पुरवठ्याबाबत साशंक असल्याने अद्यापही जोडणी होऊ शकलेली नाही. महापालिकेने यंदा एमएनजीएलने मागितलेली परवानगी मिळाली तर आगामी 2019पर्यंत शहरातील मुख्य मार्गात वायू वाहिन्या टाकण्याचे काम पूर्ण झाले असेल.

मात्र ही खोदाई बहुतांश मुख्य मार्गात असणार असून त्यातील आतल्या भागात खोदाई करून प्रत्येक इमारतीला जोडणी करून देण्यास काहीसा कालावधी लागणार आहे. नुकतीच पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या 11 गावांमध्येही वायुवाहिनी टाकली जाणार असून येत्या काही दिवसात तसा प्रस्ताव राज्य शासनापुढे ठेवण्यात येणार आहे.