Tue, Apr 23, 2019 01:38होमपेज › Pune › शेतकर्‍यांची कर्जमाफी दिलासा देणारी पण शाश्वत नाही : व्यंकय्या नायडू

‘शेतकर्‍यांची कर्जमाफी दिलासादायक पण...’

Published On: Jun 21 2018 2:19PM | Last Updated: Jun 21 2018 2:19PM पुणे : प्रतिनिधी

देशातील शेतकऱ्यांना केवळ कर्जमाफी देणे पुरेसे नाही. कर्जमाफी हा फक्त तात्पुरता  दिलासा देणारी बाब आहे पण शाश्वत नाही, असे मत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी पुण्यातील एका आयोजित कार्यक्रमात केले. 

वैकुंठ मेहता  नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ को-ऑपरेटिव्ह संस्था येथील शाश्वत शेती बनविण्यासाठीसाठी राष्ट्रीय परिषदेच्या कार्यक्रमात ते बोलत होते.  यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, एम. एस. स्वामिनाथन आदी मान्यवर उपस्थित होते.

शेतकरी हा स्वाभिमानी आहे. तो कर्जमाफी मागत नाही. त्याला फक्त लागणाऱ्या सुविधा द्या, त्याला पाहिजे तितकी वीज द्या, तीही फुकट नको पण लागेल तेवढे द्या, तसेच पाण्याबरोबरच माती परीक्षण सुविधा पुरवा. 

डॉक्टर, अभिनेता, इंजिनीअर हे त्यांच्या मुलाला त्यांचा व्यवसाय करायला सांगतात, पण शेतकरी कधीच त्याच्या मुलाला शेतकरी हो असे सांगत नाही. कारण आज  शेती ही दुष्काळ, बाजार भावाची अशाश्वतता व इतर कारणामुळे परवडत नाही. त्यासाठी प्रत्येक राज्याने योग्य ती धोरणे आखावे लागतील असेही नायडू यांनी स्पष्ट केले. 

राज्यात जलयुक्त शिवार योजनेमुळे बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे ,असे मुख्यमंत्री म्हणाले. तर  भारत हा शेतीमाल निर्यात करण्यात देशात दुसरा आहे पण शेतकऱ्यांना सुविधा आणि बाजारभावाचे अवमूल्यन यामुळे शेतकरी मागे असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले