Tue, Jun 25, 2019 13:28होमपेज › Pune › मेट्रो बांधकामात वाहन पार्किंगचा अडथळा

मेट्रो बांधकामात वाहन पार्किंगचा अडथळा

Published On: Feb 13 2018 2:01AM | Last Updated: Feb 13 2018 1:42AMपुणे : प्रतिनिधी 

वनाझ ते रामवाडे या मेट्रो मार्गिका क्रमांक दोनचे काम सध्या जोमाने सुरू आहे. मेट्रोव्यवस्थापनाकडून या मार्गाला गती देऊन काम लवकर पुर्ण करण्याचे वेळोवेळी बोलले जात आहे. 

मात्र या कामांसाठी कर्वे रस्ता, पौड रस्त्यावरील वाहतुक व्यव्स्थेत काही बदल करण्यात आलेले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून काही ठिकाणी नो पार्किंग झोन करण्यात आलेला आहे. मात्र व्यवस्थापनाच्या या निर्णयाला नागरिकांकडून हरताळ फासतानाच दिसत असल्याचे चित्र या रस्त्यावर जागोजागी दिसत आहे. 

या मार्गावर सध्या मेट्रो बांढकामासाठी च्या पिलर उभारणीसाठीचे खोदकाम, फाउंडेशन बांधणे अशी अनेक कामे सुरू आहेत. मेट्रो बांधकामा साठी रस्त्याच्या मधोमध खोदकाम सुरू असल्यामुळे त्याच्या बाजूने बॅरिकेडस लावण्यात आलेले आहे. त्यामुळे रस्ता अरुंद होत असल्याने काही काळ थोडा वाहतुक कोंडीचा प्रश्‍न भेडसावू शकतो. त्यासाठीच पौड रस्त्यावर, कर्वे रस्त्यावर काही भागात नो पार्किंग करण्यात आलेले आहे. मात्र महामेट्रोच्या व्यवस्थापनाला नागरिकांचे सहकार्य मिळत नसल्याचे चित्र आहे.

नागरिक ‘नो पार्किंग’ च्या जागी वाहने लावून मार्गस्थ होत आहेत. मेट्रोच्या कामासाठी ठेवण्यात आलेल्या बांधकामसाहित्याजवळही दुचाकी, चारचाकी पार्क करताना दिसून येत आहे. नागरिकांच्या अशा वागण्यामुळे मेट्रोच्या बांधकामालाही अडथळा होण्याबरोबरच अपघात, वाहतुककोंडीचे प्रश्‍नही वाढणार आहेत.  तुर्तास तरी मेट्रोचे काम आणि नागरिकांच्या सोयींचा मेळ घालणे व्यवस्थापनाला दिवसेंदिवस जड जाणार असल्याचेच  सध्याचे चित्र आहे.