होमपेज › Pune › उरो रुग्णालय कामगार वसाहतीची दुरवस्था

उरो रुग्णालय कामगार वसाहतीची दुरवस्था

Published On: May 10 2018 1:34AM | Last Updated: May 10 2018 12:58AMपिंपरी : प्रतिनिधी 

नवी सांगवी येथील उरो रुग्णालयाच्या कामगार वसाहतीमधील नागरिकांना अस्वच्छतेचा त्रास सहन करावा लागत आहे. ड्रेनेज, पिण्याचे पाणी वसाहतीमध्ये पसरत आहेत. अद्याप ते दुरुस्त न केल्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. या परिसरात साथीचे आजार पसरत आहेत. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्‍त केला जात आहे. नवी सांगवीमध्ये उरो व जिल्हा रुग्णालय आहे. या ठिकाणी पुण्यासह राज्यभरातून रुग्ण उपचारासाठी येत असतात. त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. या ठिकाणी गैरसोयीचे प्रमाण मोठे आहे. राज्य सरकारकडून या रुग्णालयांना सुविधा देण्याकडे उदासिनता असल्याचे चित्र आहे. उरो रुग्णालयाच्या कामगार वसाहतीमध्ये दुरवस्था मोठी पसरली आहे. 

या ठिकाणी ड्रेनेज लाईन व केबल टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खोदाई केली आहे. सततच्या खोदाईमुळे पाण्याची पाईपलाईन फुटली आहे. जुनी ड्रेनेज लाईन, पिण्याची पाईपलाईन, वीज वाहक वायर तुटल्यामुळे कर्मचारी वसाहतीत आणि बाणी सारखी स्थिती निर्माण झाली आहे. पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. विजेची वायर तुटल्यामुळे खंडित वीज पुरठ्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. कडक उन्हाळ्यात नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. ड्रेनेज व पाण्याची पाईप लाईन तुटुन एकत्र झाल्याने कामगार वस्त्यांच्या आरोग्याची समस्या वाढली आहे. या परिसरात पाणी साचलेले आहे. त्यामुळे डासांची निर्मिती होत आहे. यासह साथीचे आजार पसरत आहेत. डेंगी, चिकनगुनिया आदी साथीचे आजार पसरत आहेत. रुग्णालयाच्या आवारातच साथीचे आजार पसरल्यानंतर करायचे काय? असा सवाल कामगार वसाहतीमधील नागरिक विचारत आहेत.