Wed, Aug 21, 2019 15:42होमपेज › Pune › पु्ण्यातील काळेवाडीत तरुणाचा हात तोडला

पु्ण्यातील काळेवाडीत तरुणाचा हात तोडला 

Published On: May 14 2018 9:49AM | Last Updated: May 14 2018 9:48AMपिंपरी : प्रतिनिधी 
रिक्षा दुरुस्त करण्यासाठी थांबलेल्या तरुणावर एकाने सत्तूराने वार केल्याची घटना घडली आहे. अज्ञाताने केलेल्या हल्ल्यात गणेश कमलाकर शेलके (28, रा. काळेवाडी) हा तरुण जखमी झाला आहे. याप्रकरणी त्याने वाकड पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, तोंडाला रुमाल बांधून आलेल्या एका अज्ञाताने गणेशवर अचानकपणे हल्ला केला. या हल्लेखोराने हाताच्या मनगटावर वार करुन गणेशचा हात तोडला आहे. रविवारी सायंकाळी ही घटना घडली. वाकड पोलिस याप्रकरणाचा तपास करत आहेत.