Fri, Mar 22, 2019 01:28
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › भाजपचा कामगार कायद्यात अन्यायकारक बदल

भाजपचा कामगार कायद्यात अन्यायकारक बदल

Published On: May 27 2018 1:20AM | Last Updated: May 27 2018 1:17AMपिंपरी : प्रतिनिधी 

भाजपाच्या  केंद्र व  राज्य सरकारने   मागील चार वर्षांत कायद्यात अनेक अन्यायकारक बदल करून देशभरातील जनतेला महागाई व बेरोजगारीच्या खाईत लोटले आहे, अशी टिका कामगार संघटना संयुक्‍त कृती समितीचे पुणे जिल्हा अध्यक्ष कैलास कदम यांनी पत्रकार परिषदेत केली. 

‘केंद्र व राज्य सरकार कामगार हिताकडे दुर्लक्ष करून कामगार कायद्यात अनेक अन्यायकारक बदल करीत आहे.’ याबाबत जनजागृती करण्यासाठी कामगार संघटना संयुक्‍तकृती समिती, पुणे जिल्हा यांच्या वतीने पिंपरी येथे शनिवारी (दि. 26) पत्रकार परिषद आयोजित केली होती. या वेळी अजित अभ्यंकर (सिटू), अ‍ॅड. म. वि. अकोलकर (उपाध्यक्ष, इंटक), माधव रोहम, अनिल रोहम (आयटक), पांडूरंग गडेकर (पोस्ट एम्प्लाईज युनियन), अ‍ॅड. सयाजी शिंदे आदी या वेळी उपस्थित होते. 

कदम पुढे म्हणाले की, केंद्र व राज्य सरकार भांडवलदारांना पुरक धोरण राबवित आहे. त्यामुळे मागील चार वर्षात रोजगारांत घट झाली आहे. त्याचा परिणाम देशातील जीडीपीमध्ये झाला आहे. सर्वंच क्षेत्रातील कामगार अस्थिर आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य सरकार, राज्य सरकारची सर्व महामंडळे, त्याचबरोबर केंद्र सरकार व केंद्र सरकारच्या अंगीकृत संस्था, उपक्रम आणि संरक्षण क्षेत्रात देखील खाजगी उद्योगांप्रमाणे ठेकादारी कामगारांचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढत आहे.

शासन देखील ठेकेदारांना पुरकच धोरण राबवित आहे. यामुळे कामगार कायम कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक असुरक्षिततेच्या छायेखाली जगत आहे. कामगारांच्या हक्‍कांसाठी, कामगारांमध्ये जनजागृती करण्यासाठी कामगार संघटना संयुक्‍तकृती समिती, पुणे जिल्हा यांच्या वतीने प्रयत्न करणार आहे.कॉम्रेड अजित अभ्यंकर म्हणाले की, भाजपचे हे शेवटचे वर्ष आहे. पुढील निवडणूकीत जनता त्यांचा पाडाव करेल.