Sun, Nov 18, 2018 19:50होमपेज › Pune › पुणे : वाकडच्या हद्दीत अनोळखी मृतदेह सापडला

पुणे : वाकडच्या हद्दीत अनोळखी मृतदेह सापडला

Published On: Jul 30 2018 5:20PM | Last Updated: Jul 30 2018 5:20PMपिंपरी : प्रतिनिधी 

वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीत नुकतेच एका अनोळखी महिलेचा मृतदेह सापडला होता. त्या महिलेच्या मृतदेहावरून दुहेरी हत्याकांडाचा उलगडा पोलिसांनी केला आहे. ही घटना ताजी असताना आज सकाळी पुन्हा डांगे चौक येथे एक अनोळखी मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळून आल्याने पोलिसांची धावपळ सुरू झाली आहे. 

डांगे चौक, सोळा नंबर परिसरात सकाळी आकाराच्या सुमारास इमारतीच्या तळमजल्यावरील खोलीत पन्नास वर्षीय अज्ञात इसमाचा मृतदेह मिळून आला. 

मृतदेह कुजला असल्याने तीन ते चार दिवसापूर्वी त्याचा मृत्यू झाला असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.