Thu, Feb 21, 2019 01:12होमपेज › Pune › सेल्फीच्या नादात माथेरानमध्ये महिलेचा दरीत पडून दुर्दैवी मृत्यू

सेल्फीच्या नादात माथेरानमध्ये महिलेचा दरीत पडून दुर्दैवी मृत्यू

Published On: Jun 21 2018 1:21AM | Last Updated: Jun 21 2018 12:50AMमाथेरान/ नेरळ ः वार्ताहर 

महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे पाहण्यासाठी राममहेश चौहान पत्नी सरिता चौहान, तसेच मुलगी निधी, सिद्धी आणि मुलगा आदि या तिन्ही मुलांसह आपल्या पत्नीच्या भावाकडे पुणे येथे आल्यावर राममहेशने महाबळेश्वर, माथेरान तसेच मुंबईचा फिरण्यासाठी बेत आखला. त्यानुसार माथेरान येथील लुईसा पॉइंट येथे  पत्नी सरिता (वय 35) हिचा सेल्फीच्या छंदामुुळे तोल गेल्याने खोल दरीत पडून जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. 

राममहेश चौहान आपल्या कुटुंबासोबत दिल्ली येथून 1 जून रोजी पुण्यातील आपल्या नातेवाईकांकडे आले होते. जवळचे हिलस्टेशन पाहावे म्हणून महाबळेश्वर फिरल्यानंतर  19 जून रोजी दुपारी 1 वाजता माथेरान येथे आले. सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास माथेरान येथील प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी ते गेले होते. तेथे लुईसा पॉइंटवर पत्नी सरिता सेल्फी घेत असताना अचानक तोल गेल्याने दरीत पडून त्यांचा मृत्यू झाला.