Wed, Jun 26, 2019 17:26होमपेज › Pune › अनधिकृत जाहिरात फलकांना बसणार चाप

अनधिकृत जाहिरात फलकांना बसणार चाप

Published On: Dec 07 2017 1:24AM | Last Updated: Dec 06 2017 11:42PM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

शहरातील अनधिकृत जाहिरात फलकांवर कडक कारवाई करण्यासाठी पालिका प्रशासनाने पावले उचलली आहेत. शहरातील जाहिरात फलकांचे जीपीएस मॅपिंग करण्यात येणार आहे. यामुळे अनधिकृत जाहिरात फलकांवर आपोआप चाप बसणार आहे. 

पुणे शहरामध्ये अनधिकृत फलकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. या फलकांची संख्या जास्त असल्याने महापालिका प्रशासनाला कारवाई करताना अडचणी येत आहेत. यामध्ये फलक नक्की कोणाच्या मालकीचे आहे. जागा मालक कोण, कोणाला नोटीस द्यायची, आदी प्रश्‍न अतिक्रमण विभागासमोर निर्माण होतात. 

त्यामुळे अशा फलकांवर कारवाई करता येत नाही. महापालिकेचे अधिकृत 1 हजार 700 फलक आहेत. येत्या दोन महिन्यामध्ये प्रत्येक फलकाचे स्थान निश्‍चित करुन त्याचे जीपीएस मॅपिंग करण्यात येणार आहे. यामुळे याठिकाणी असलेल्या फलकाचा प्रकार, त्याचे ठिकाण आणि आकाराची माहिती कळू शकणार आहे. पालिका प्रशासनाने यासाठी सॉफ्टवेअर तयार केले आहे.