Tue, Mar 19, 2019 11:37होमपेज › Pune › एक पोलिस कर्मचारी जखमी

उज्ज्वल निकम अपघातातून बचावले

Published On: Jun 05 2018 1:28AM | Last Updated: Jun 05 2018 1:22AMपुणेः प्रतिनिधी

मुंबई-पुणे दु्रतगती मार्गावर खोपोली हद्दीत सोमवारी संध्याकाळी 7.20 वाजेच्या सुमारास विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या कारला अपघात झाला. या अपघातात ते बचावले आहेत. मात्र, यामध्ये एक पोलिस कर्मचारी जखमी झाला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी उज्ज्वल निकम हे मुंबईच्या दिशेने सुरक्षा रक्षकांच्या ताफ्यासोबत निघाले होते. त्यांच्या कारच्या पाठीमागे पोलिसांची कार होती. खोपोलीच्या हद्दीत आल्यानंतर अचानकपणे पोलिसांच्या कारने उज्ज्वल निकम यांच्या कारला पाठीमागून धडक दिली. या अपघातात सरकारी वकील उज्ज्वल निकम हे बचावले असून, ते सुखरूप असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

या अपघातात पोलिस कर्मचारी तोंडसे हे जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात झाल्यानंतर उज्ज्वल निकम यांना दुसर्‍या कारने मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आले आहे.