होमपेज › Pune › उजनी धरण ‘ओव्हरफ्लो’

उजनी धरण ‘ओव्हरफ्लो’

Published On: Aug 28 2018 1:36AM | Last Updated: Aug 28 2018 1:08AM



निमगाव केतकी : प्रतिनिधी

पुणे, सोलापूर व अहमदनगर जिल्ह्यांसह मराठवाड्यालाही वरदान ठरलेले  राज्यातील दोन नंबरचे असलेले उजनी धरण सोमवारी (दि. 27) दुपारी 12 वाजता 100 टक्के भरले. धरणाच्या 42 मोर्‍यांपैकी 16 मोर्‍यांतून 10 हजार क्युसेकने पाण्याचा भीमा नदीत विसर्ग सुरू आहे.

सध्या उजनीत 117 टीएमसी पाणीसाठा आहे. साठवणूक स्थिती उच्चांकी झाल्याने पुण्यातील 19 धरणांतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग उजनीच्या जलाशयात येत आहे. दौंडमधून 40 हजार 226 क्युसेकचा विसर्ग  होत आहे. उजनी धरणाने उशिरा, पण संथ गतीने का होईना आजअखेर 100 टक्क्यांपर्यंत टप्पा गाठला. शेतकर्‍यांबरोबरच उद्योगधंदे, कारखानदार व नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. 

दरम्यान, वीजनिर्मिती केंद्रात तांत्रिक बिघाड झाल्याने ते बंद करण्यात आले आहे. भीमा खोर्‍यात सुरू असलेल्या पावसामुळे दररोज पाण्याच्या विसर्गात वाढ होत आहे. निरा आणी भीमेच्या पाण्यात वाढ होत असल्याने नदीकाठच्या नागरिकांना जलसंपदा विभागाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.