Sat, May 25, 2019 22:37होमपेज › Pune › उद्योगनगरी झाली घामाघूम

उद्योगनगरी झाली घामाघूम

Published On: May 08 2018 1:54AM | Last Updated: May 08 2018 12:23AMपिंपरी : प्रतिनिधी

मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच सूर्याने आग ओकायला सुरुवात केली असून, पिंपरी-चिंचवड शहरवासीय असह्य उकाड्याने हैराण झाले आहेत. शहराच्या पार्‍याने 40 अंशांपर्यंत मजल मारल्याने पिंपरी- चिंचवडकर  कडक उन्हाच्या झळांनी पोळून निघाले आहेत.अवघ्या महाराष्ट्रात उष्णतेने कहर केला असताना उद्योगनगरीही यातून सुटलेली नाही. सोमवारी (दि.7) पार्‍याने 39 अंशांपर्यंत मजल मारल्याने शहरवासीय उन्हाच्या झळांनी त्रस्त झाले होते. कडक उन्हाच्या झळा आणि त्यात विजेचा लपंडाव यामुळे नागरीकांचे हाल होत असून नागरीकांना उन्हामुळे घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे अनेकांनी दुपारीच्या वेळी घराबाहेर न पडणेच पसंत करीत आहेत. 

राज्यातील बहुतांश भागात कमाल तापमानाने चाळिशी पार केली असूनही शहराचे तापमान चाळिशीपर्यंत पुढे सरकत आहे. गेल्या काही दिवसांपासून 38 ते 40 अंश सेल्सिअस दरम्यान स्थिरावलेल्या तापमान उसळी घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोमवारी शहरात कमाल तापमान 39 अंश तर किमान तापमान 24.4 अँश नोंदवण्यात आले. सातत्याने वाढणारे तापमान कधी कमी होते याची नागरीक प्रतिक्षा करत असून उन्हात फिरणे टाळा, भरपूर पाणी प्या व आरोग्य जपा असा सल्ला वेैद्यकीय अधिकार्‍यांनी दिला आहे.