Tue, Apr 23, 2019 13:44होमपेज › Pune › दुचाकी घसरून दोन युवक जागीच ठार

दुचाकी घसरून दोन युवक जागीच ठार

Published On: Jan 24 2018 6:50PM | Last Updated: Jan 24 2018 6:31PMराजगुरुनगर : वार्ताहर

पुणे नाशिक महामार्गावर पानमळा येथे दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. दुपारच्या सुमारास हा अपघात झाला. विजय नंदकिशोर आहिर (वय १७,रा. आहीरवाडा,चिंचवडगाव) आणि अभिषेक भालचंद्र कदम (वय १७,रा माळी आळी,गांधी पेठ,चिंचवडगाव) अशी मृत युवकांची नावे आहेत.

अपघातात मृत्यू झालेले दोघे युवक चिंचवड गावातील एका महाविद्यालयात बारावीमध्ये शिकत होते. हे दोघे मित्र दुचाकी (अॅक्सेस क्र.एम एच १४ एफ पी ८५१४) वरून वेगाने जात असताना हा अपघात झाला. यात दुचाकीस्वार दोघांच्याही डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातादरम्यान दोघांच्याही डोक्यातून जास्त रक्तस्त्राव झाल्याने उपचारापूर्वींच त्यांचा मृत्यू झाला. 

ज्या दुचाकीवरून अपघात झाला ती दुचाकी सुस्थितीत असल्याने हा अपघात नेमका कसा झाला? याबाबत चर्चा आहे. या घटनेचा पोलिस अधिक तपास करीत आहेत.