Thu, Jan 17, 2019 04:35होमपेज › Pune › दोन गावठी पिस्तूल, सोळा काडतुसांसह दोन सराईत जाळ्यात

दोन गावठी पिस्तूल, सोळा काडतुसांसह दोन सराईत जाळ्यात

Published On: Mar 04 2018 1:40AM | Last Updated: Mar 04 2018 12:48AMपुणे / येरवडा : प्रतिनिधी 

सासवड पोलिस ठाण्यात दाखल गंभीर गुन्ह्यातील फरार असलेल्या दोघांना येरवडा पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तूल व सोळा जिंवत काडतुसे व एक मोबाईल फोन जप्‍त करण्यात आले आहेत.  

तुकाराम सखाराम बडदे (21) व तुषार गेनबा जरांडे (24, दोघेही रा.कोडीत, ता. पुरंदर) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. पोलिस निरीक्षक मुकुंद महाजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास पथकातील पोलिस हवालदार बाळासाहेब बहिरट यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की  कॉमरझोन येरवडा येथील बस स्टॉपजवळ सासवड पोलिस ठाण्यात दाखल गंभीर गुन्ह्यातील दोन आरोपी येणार आहेत. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून तुकाराम बडदे व तुषार जरांडे यांना ताब्यात घेतले. 

अधिक तपासात हे दोघेही सासवड पोलिस ठाणे हद्दीतील रेकॉर्डवरील आरोपी असून त्यातील बडदे हा खंडणीच्या गुन्ह्यात दोन महिन्यांपासून फरारी होता. तपास उपनिरीक्षक देशमुख करीत आहेत.

ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुकुंद महाजन, प्रवीण देशमुख, सहाय्यक फौजदार कुताळ, पोलिस कर्मचारी बाळसाहेब बहिरट, पोलिस हवालदार बेग, हनुमंत जाधव, जगताप तसेच पोलीस नाईक कुंवर, पोलिस शिपाई बांगर, शिंदे, पाटोळे  यांनी केली.