Tue, Feb 19, 2019 12:20होमपेज › Pune › स्वाइन फ्लू चे दोन रुग्ण व्हेंटिलेटरवर

स्वाइन फ्लू चे दोन रुग्ण व्हेंटिलेटरवर

Published On: Mar 20 2018 2:06AM | Last Updated: Mar 20 2018 1:16AMपुणे : प्रतिनिधी

पुण्यात स्वाइन फ्लू चे कमबॅक होत असून जानेवारीपासून आतापर्यंत सात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी पाच रुग्ण उपचार घेउन घरी गेले असून दोन रुग्ण व्हेंटीलेटरवर उपचार घेत आहेत. 

गेल्यावर्षी स्वाईन फ्लू ने पुणे शहरात 148 तर राज्यात 777 रुग्णांचा बळी घेतला होता. यावर्षीही अडीच महिन्यात सात पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तसेच तीन हजार संशयित रुग्णांना टॅमिफ्लू या गोळया देण्यात आल्या असून 353 रुग्णांचे घशातील स्त्राव तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणु संस्थेकडे पाठविण्यात आले आहेत. 

हवामानातील तीव्र फरक, रात्री थंडी व दिवसा उन्हाचा कडाका हे वातावरण या विषाणुसाठी पोषक ठरते. त्यामुळे स्वाईन फ्लू चा प्रभाव यावर्षीदेखील कायम राहणार असल्याचे दिसून येत आहे. जानेवारीपासून आतापर्यंत एक लाख 90 हजार संशयित रुग्णांचे स्क्रिनिंग अर्थात तपासणी करण्यात आली. दररोज महापालिकेच्या रुग्णालये, बाहयरुग्ण विभाग येथे अडीच ते तीन हजार रुग्ण तपासणीसाठी येत आहेत.

स्वाइन फलू ची लागण होउ नये म्हणून महापालिकेच्या प्रसूतीगृहांमध्ये गरोदर महिला, रक्‍तदाब, मधुमेही रुग्ण यांना मोफत ही लस दिली जात आहे. त्याचा रुग्णांनी लाभ घ्यावा असे अवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

 

Tags : Pune, Pune News, Swine Flu, Patients,