Fri, Apr 26, 2019 15:21होमपेज › Pune › कार-कंटेनरच्या धडकेत दोघे ठार; पाच जखमी  

कार-कंटेनरच्या धडकेत दोघे ठार; पाच जखमी  

Published On: Jan 11 2018 1:28AM | Last Updated: Jan 11 2018 12:06AM

बुकमार्क करा
वडगाव मावळ : वार्ताहर 

पुणे- मुंबई महामार्गावर विनोदेवाडी गावाजवळ कार व कंटेनरच्या धडकेत अलिबाग येथे फिरायला जाणार्‍या दोन तरुणांचा मृत्यू झाला, तर कंटेनरचालकासह 5 जण जखमी झाल्याची दुर्घटना बुधवारी (दि.10) पहाटे घडली. 

राकेश दक्षणामूर्ती नायडू (25, रा. एनडीए, शिवणे) व राहुल दत्तात्रय नागरगोजे (23, रा. केशवनगर, मुंढवा, पुणे, मूळ रा. हवणगाव, ता. रेणापूर, जि. लातूर) हे दोघेजण या अपघातात जागीच ठार झाले असून, राजेंद्र चांगोत्रे (23, रा.एनडीए, खडकवासला), दिपांशू भारद्वाज (23, रा. वाकड, पुणे), अमत सिंग (23, रा. लवासा), रविकुमार प्रेमसिंग (24,रा. वारजे, पुणे) व कंटेनरचालक लालचंद्र यादव हे पाचजण जखमी झाले.

अपघातातील मृत राहुल नागरगोजे याचा वाढदिवस मित्रांनी पुणे येथील त्याच्या हॉटेलवर साजरा केला व पहाटेच्या सुमारास ते इको स्पोर्टस् कार क्र. (एमएच 14 एफएम 7261) ने अलिबाग येथे फिरण्यासाठी निघाले होते. दरम्यान, पुणे-मुंबई महामार्गाने भरधाव जात असताना पहाटे सव्वापाचच्या सुमारास विनोदेवाडी गावाजवळील वळणावर गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी पुण्याकडे जाणार्‍या लेनवर गेली आणि कंटेनर (एमएच 43 ई 6546) ला धडकली.कारचे इंजिन उडून महामार्गाच्या कडेच्या भिंतीवर आदळले व दोन्ही वाहने महामार्गालगतच्या खड्ड्यामध्ये पडली. दरम्यान, अपघातातील जखमींना वडगाव मावळ पोलिसांनी तत्काळ सोमाटणे फाटा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार राजेंद्र कर्डिले करत आहेत.