Thu, Apr 18, 2019 16:01होमपेज › Pune › राजस्थान पोलिसांना पुण्याच्या लाच लुचपत पथकाने पकडले

राजस्थान पोलिसांना पुण्याच्या लाच लुचपत पथकाने पकडले

Published On: May 13 2018 6:05PM | Last Updated: May 13 2018 6:05PMपुणे : प्रतिनिधी

राजस्थान येथील पोलिस अधिकार्‍यासह दोघांना पुण्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने लाच स्विकारताना रंगेहात पकडले आहे.  एका गुन्ह्याच्या तपासासाठी आल्यानंतर गुन्ह्यात अडकविण्यासाठी ५० हजाराची लाच घेताना त्यांना पकडण्यात आले आहे. सहायक उपनिरीक्षक रामलाल छगनलालजी गुर्जर (वय ५६, रा. उदयपूर, राज्य. राजस्थान) आणि पोलिस शिपाई प्रेमसिंग धरमसिंग (वय २६) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले दोघेही राज्यस्थानातील उदयपूर जिल्ह्यातील आंबामाता पोलिस ठाण्यातील कर्मचारी आहेत. आंबामाता पोलिस ठाण्यात तक्रारादर यांच्या मेव्हण्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी दोघे पुण्यात आले होते. मात्र, ते त्यांच्या घरी नव्हते. त्यांनतर त्यांनी तक्रारदारांना संपर्क साधला. तसेच, तक्रारदार यांच्या बहिणीस फसवणुकीच्या गुन्ह्यात सहआरोपी न करण्यासाठी ३ लाखाची लाच मागितली. याबाबत तक्रारदारांनी पुणे लाच लुचपत प्रतिबंधक पथकाकडे तक्रार केली. त्यानंतर दोघांना ५० हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले.