होमपेज › Pune › चैन चोरी करणाऱ्या तोतया पत्रकाराला अटक 

चैन चोरी करणाऱ्या तोतया पत्रकाराला अटक 

Published On: Jun 05 2018 3:49PM | Last Updated: Jun 05 2018 3:48PM वाकड : वार्ताहर

चैन चोरी करणाऱ्या तोतया पत्रकारासह एकाला वाकड पोलिसांनी अटक केले असून त्यांच्याकडून अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नसीम सादिक उस्मानी ( ३२, रा. थेरगाव) या बोगस पत्रकारासह मोहमद शराफतहुसेन अली ( २४,रा.थेरगाव)  या दोघांना अटक करण्यात आली आहे.पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, नसीम आणि मोहमद हे शबनम न्यूज या वेब चॅनलमध्ये पत्रकार असल्याचे सांगत शहरात फिरत होते. त्याच्याकडे शबनम न्यूजचे ओळखपत्र तसेच इतरही विवध संघटनेचे नियुक्ती पत्र मिळाली आहेत.

वाकडमध्ये एका चैन चोरी प्रकरणात पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले असता चोरी करणारा शबनम न्यूज या वेब चॅनलचा पत्रकार असल्याची माहिती समोर आली. त्याला ताब्यात घेऊन तपास केला असता या जोडगोळीने वाकडमध्ये तीन आणि सांगवी परिसरात दोन चोऱ्या केल्याचे कबूल केले. त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.