Thu, Jan 30, 2020 00:00होमपेज › Pune › सव्वा लाख विद्यार्थी देणार संगणक टायपींग परीक्षा

सव्वा लाख विद्यार्थी देणार संगणक टायपींग परीक्षा

Published On: Dec 31 2017 1:47AM | Last Updated: Dec 31 2017 1:41AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दि. 2 ते 8 जानेवारी आणि 13 ते 18 जानेवारी या कालावधीत संगणक टायपिंग परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी तब्बल 1 लाख 27 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरले आहेत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेमार्फत मराठी, हिंदी आणि इंग्रजी 30 आणि 40 श.प्र.मी. हि संगणक परीक्षा घेतली जाते. हि परीक्षा ऑनलाईन होणार असून त्याचा निकाल विद्यार्थ्यांना तत्काळ समजणार आहे.

मराठी आणि हिंदीच्या परीक्षा दि.13 ते 18 जानेवारी दरम्यान होणार आहे. मराठीच्या परीक्षेसाठी 40 हजार 418 तर हिंदी परीक्षेसाठी 1 हजार 349 उमेदवारांनी नोंदणी केली आहे.इंग्रजीच्या 30 आणि 40 श.प्र.मी. च्या परीक्षा दि.2 ते 8 जानेवारी दरम्यान होणार असून त्यासाठी 85 हजार 237 उमेदवारांनी नोंदणी केली आहे. मराठी हिंदी व इंग्रजीच्या ई-मेल, लेटर, स्टेटमेंट या प्रश्‍नांसाठी बॅकस्पेस या बटनांचा वापर करण्याची परवानगी होती.परंतु स्पीड मॅसेजमध्ये बॅकस्पेस आणि डीलीट या बटनांचा वापर केल्यास उमेदवारांचे गुण कमी होत असत.त्या पार्श्‍वभूमीवर राज्य परीक्षा परिषदेने आता मॅसेजमध्येही बॅकस्पेस आणि डीलीट या बटनांचा वापर करण्याची परवानगी दिली असल्याची माहिती परीक्षा परीषदेतील अधिकार्‍यांनी दिली आहे.

एकूण 1 लाख 27 हजार विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले असून 30 श.प्र.मी साठी मुंबई 6 हजार 625 ,रायगड 2 हजार 553,ठाणे 7 हजार 64, पालघर 1 हजार 811, पुणे 6 हजार 927, अहमदनगर 5 हजार, सोलापूृर 2 हजार 963, नाशिक 6 हजार 228,धुळे 1 हजार 817, जळगाव 3 हजार 05, नंदुरबार 1 हजार 136, कोल्हापूर 4 हजार 607, सातारा 5 हजार 972 , सांगली 4 हजार 420, रत्नागिरी 2 हजार 264, सिंधुदुर्ग 917, औरंगाबाद 3 हजार 946, जालना 1 हजार 520 बीड 2 हजार 490, परभणी 818, हिंगोली 754, अमरावती 3 हजार 481, बुलढाणा 3 हजार 319, अकोला 3 हजार 199, वाशिम 1 हजार 12, यवतमाळ 3 हजार 538, नागपूर 4 हजार 256, भंडारा 967, गोंदीया 1 हजार 155, वर्धा 1 हजार 404, चंद्रपूर 2 हजार 205, गडचिरोली 555, लातूर 2 हजार 700, उस्मानाबाद 1 हजार 867, नांदेड 3 हजार 1 55  अशा एकूण 1 लाख 5 हजार 963 विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे. 

तर 40 श.प्र.मी साठी मुंबई 586 ,रायगड 227  ठाणे 1 हजार 77, पालघर 162  पुणे 1 हजार 115, अहमदनगर 1 हजार 152 सोलापूृर 507, नाशिक 1 हजार 10,धुळे 204, जळगाव 449, नंदुरबार 83, कोल्हापूर 1 हजार 72, सातारा 1 हजार 407 , सांगली 1 हजार 185, रत्नागिरी 286 , सिंधुदुर्ग 115, औरंगाबाद गोवा 5 औरंगाबाद 1 हजार 43, जालना 208, बीड 877, परभणी 183, हिंगोली 219, अमरावती 639, बुलढाणा 802, अकोला 797, वाशिम 337, यवतमाळ 722, नागपूर 742, भंडारा 221, गोंदीया 154, वर्धा 386, चंद्रपूर 537, गडचिरोली 99, लातूर 686, उस्मानाबाद 805, नांदेड 942  अशा एकूण 21 हजार 41 विद्यार्थ्यांनी अर्ज केला असल्याची माहिती राज्य परीक्षा परीषदेकडून देण्यात आली आहे.