Wed, Apr 24, 2019 16:22होमपेज › Pune › तूर घोटाळा : अनिल देशमुख यांच्यावरील कारवाई अपुरी

तूर घोटाळा : अनिल देशमुख यांच्यावरील कारवाई अपुरी

Published On: Apr 12 2018 4:24PM | Last Updated: Apr 12 2018 4:23PMपुणे : प्रतिनिधी

राज्य सरकारने गेल्या वर्षी खरेदी केलेल्या तुरीवरील प्रक्रियेच्या कामात झालेल्या २ हजार कोटी रुपयांच्या घोटाळा झाला. याप्रकरणी राज्य सहकारी पणन महासंघाचे महाव्यवस्थापक अनिल देशमुख यांच्यावर केलेली निलंबनाची कारवाई ही अपुरी आहे. हा सर्व घोटाळा मंत्र्यांच्या सांगण्यावरून झाला असल्याने या प्रकरणी पणन मंत्री सुभाष देशमुख यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करून संपूर्ण घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणी विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

पश्चिम महाराष्ट्रात सुरू असलेल्या हल्लाबोल यात्रेदरम्यान आज पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील वरवंड येथील सभेत ते बोलत होते. राज्य सरकारने गेल्या वर्षी खरेदी केलेल्या तुरीवरील प्रक्रियेच्या कामात झालेल्या २ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी मी अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुराव्यासह विषय उपस्थित केला होता, मात्र मुख्यमंत्र्यांनी या घोटाळ्यालाही क्लीन चीट दिली. त्यावेळी क्लीन चीट दिली मात्र आता काल महाव्यवस्थापक अनिल देशमुख यांच्यावर केलेली निलंबनाची कारवाई का केली असा सवाल उपस्थित करताना ही कारवाई म्हणजे हा घोटाळा झाल्याचे सिद्ध करणारी आहे. 

हा सर्व घोटाळा मंत्रालयातून झाला आहे. स्वतः मंत्री यांनी याबाबतचे तोंडी आदेश दिले होते. हे सर्व रेकॉर्डवर उपलब्ध आहेत. त्याचे पुरावे आहेत त्यामुळे या घोटाळ्यात देशमुख यांचा बळी देऊन बड्या माशांना वाचवण्याचा प्रयन्त होत असल्याचे मुंडे म्हणाले. देशमुख तर या घोटाळ्याला जबाबदार आहेतच त्याच बरोबर मंत्री सुभाष देशमुख हे ही जबाबदार असल्याने त्यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करावे अशी मागणी त्यांनी केली. 

या घोटाळ्यातील कंपनी सप्तश्रृंगीचे कंत्राट रद्द करावे, कंपनीचे सर्व रेकॉर्ड जप्त करावे, बँक व्यवहार तपासावेत, कंपनीने कोणा कोणाला पैसे दिले, कंपनीचे दाल आयात- निर्यात केली त्याचे रेकॉर्ड, जी दाळ पुरवठा केली याची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.