Fri, Jul 19, 2019 05:03होमपेज › Pune › संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सणसर मुक्कामी 

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सणसर मुक्कामी 

Published On: Jul 14 2018 8:04PM | Last Updated: Jul 14 2018 8:04PMभवानीनगर : प्रतिनिधी 

पंढरपूला विठूरायाच्या भेटीला निघालेल्या जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे पुणे जिल्ह्यातील इंदापुर तालुक्यात प्रवेश केल्या नंतर भवानीनगर मध्ये भक्तीमय वातावरणात स्वागत करण्यात आले. पालखीचा आजचा मुक्काम सणसर येथे विसावला.

पालखी सोहळ्याने भवानीनगर येथे इंदापुर तालुक्यात प्रवेश केल्यानंतर आमदार दत्ताञय भरणे, जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य विभागाचे सभापती प्रविण माने, पंचायत समितीचे सभापती करण घोलप, जिल्हा परिषद सदस्य सागर भोसले, श्री छञपती कारखान्याचेसंचालक रणजित निंबाळकर सजेराव जामदार गणेश झगडे यांनी स्वागत केले.