Thu, Apr 25, 2019 05:26होमपेज › Pune › ...अन्यथा देशव्यापी आंदोलन करू : डॉ. आढाव यांचा इशारा

...अन्यथा देशव्यापी आंदोलन करू : डॉ. आढाव यांचा इशारा

Published On: Jan 31 2018 2:06AM | Last Updated: Jan 31 2018 2:06AMपुणे ः प्रतिनिधी

असंघटित कामगारांना एकत्र करून तयार करण्यात आलेला माथाडी कायदा मोडीत काढण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. हा कायदा कामगारांसाठी असून, तो मोडीत काढणार असाल तर सर्व कष्टकरी देशव्यापी आंदोलन करतील, असा इशारा  राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी दिला.

टिळक चौकातील सेनापती बापट पुतळ्यासमोर महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस अभिवादन करून जनता न्यायालय भरविण्यात आले. त्यात जनतेच्या भूमिकेबाबत तेथील पादचार्‍यांशी संवाद साधून कामगार कायद्यासंदर्भात त्यांची मते घेण्यात आली. 

या जनता न्यायालयात राज्यातील विविध संघटनांनी सहभाग नोंदविला. बळीराजा शेतकरी संघ, शिवप्रेमी जनजागरण समिती व इतर संघटनांनी या आंदोलनास पाठिंबा दिला आहे. यावेळी अनेक कामगार नेते उपस्थित होते. विक्रेंद्रित पद्धतीने चाललेली सध्याची माथाडी मंडळे सशक्‍त करण्याऐवजी त्यांना संपवण्याचे काम सुरू आहे. राज्यात काही गुंड प्रवृत्तीचे लोक माथाडींचे नाव घेऊन ही चळवळ बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रकारच्या गुन्हेगारी कृत्यांना पायबंद घालावा, अशी मागणीही त्यांनी केली.