Mon, Sep 24, 2018 12:58होमपेज › Pune › सोशल मीडियावरील ट्रोलिंगला घाबरत नाही : अमृता फडणवीस 

सोशल मीडियावरील ट्रोलिंगला घाबरत नाही : अमृता फडणवीस 

Published On: Aug 31 2018 3:34PM | Last Updated: Aug 31 2018 3:34PMपुणे : प्रतिनिधी 

सोशल मीडियावर केल्या जाणार्‍या ट्रोलिंगला मी घाबरत नाही. आपण जेव्हा सोशल व्यासपीठावर व्यक्त होत असतो, तेव्हा लोकांच्या प्रतिक्रिया या येणारच. फक्त त्या कोणत्या भाषेत केल्या जातत हेही महत्त्वाचे. मात्र मी एकदा काही पोस्ट केली की पुन्हा त्यावर जाऊन काहीही पाहात नाही अथवा प्रतिक्रिया देत नाही,  असे मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.

 शहरात खास महिलांसाठी असलेल्या दागिने व कपड्यांच्या ‘कुटूर’ या प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी त्या आल्या होत्या तेव्हा महिला सक्षमिकरण या विषयावर त्यांनी पत्रकारांसाठी संवाद साधला. 

सध्या लहान मुलींवर होणार्‍या अत्याचारांचे प्रमाण वाढले आहे, यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे. आज मुख्यमंत्र्यांकडेच गृहखाते आहे, परंतु अशा घटनांमधे वाढ होतच आहे यावर  त्या म्हणाल्या , ‘असे दानवी कृत्य करणार्‍यांना कटोर शिक्षा झाली पाहिजे. याशिवाय मुलींना वाढवताना त्या सक्षम कशा होतील हे बघताना, समाजाचा दृष्टिकोनही बदलायला हवा. प्रत्येक महिलेने आत्मविश्‍वास घेऊन जगायला हवे असे मला नेहमीच वाटते.