Wed, Jan 16, 2019 17:34होमपेज › Pune › #Women’sDayआदिवासी महिलांची पावले व्यवसायाकडे

#Women’sDayआदिवासी महिलांची पावले व्यवसायाकडे

Published On: Mar 08 2018 1:21AM | Last Updated: Mar 08 2018 12:19PMआयटी क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणार्‍या पिंपळे गुरव परिसरात आता आदिवासी महिलाही आपले उद्योजक होण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवताना दिसत आहे. आपल्यातील कलागुणांना योग्य त्या प्रकारे आकार देवून या महिला घरगुती व्यवसायाला प्राधान्य देत सक्षमपणे आपल्या स्वतःच्या पायावर उभ्या राहताना दिसून येत आहे.

धानोरी, दिघी, बोपखेल, भोसरी, दापोडी, पिपळे गुरव, नवी सांगवी भागातील आदिवासी महिला, बचत गटातील आदिवासी जमातीतील महिला आज पारंपरिक व्यवसायाकडे वळलेल्या पहायला मिळतात. पारंपारिक भात शेतीतून हात सडीचे तांदूळ, नाचणी पापड, करंवादाचे लोणचे, आदिवासी वनस्पतीपासून सुगंधी द्रव्ये, अगरबत्ती, मोहाच्या फुलाचे सिरप, जॅम, लाडू (डायबेटीस, बीपीसाठी हितकारक)आदी वस्तु त्यांनी विक्रीसाठी ठेवल्या आहेत. त्यांच्या अस्सल ग्रामीण पदार्थांना ग्राहकांतूनही मोठी पसंती मिळत आहे. 

शहरातील जुन्नर , आंबेगाव , खेड या आदिवासी पाड्यात भात शेती प्रामुख्याने केली जाते. त्याच भागातील शेतातून हात सडीचे तांदूळ अगदी लोंब्या गिरणीतून काढण्यापासून ते तांदूळ बाजारात मार्केटिंग करण्यापर्यंत सगळी कामे या महिलाच करतात. तांदूळ  पाकिंगपासून त्याची निर्यात शहरात करण्यापर्यंतची सगळी कामे त्या लिलया पार पाडत आहेत.  

विचारांची देवाण घेवाण देखील होत असल्याचे मत नंदा कवठे यांनी सांगितले. मंगल वर्दे म्हणाल्या,  मेसेज , फेसबुक पेज, व्हाट्सअप, फ्लेक्सच्या माध्यमातून मार्केटिंग केले जाते. आदिवासी संघाचे अध्यक्ष अनाना शेळके म्हणाले, सरकारकडून आदिवासी महिला व्यवसायाला मार्केटिंगचे प्रशिक्षण मिळाले पाहिजे. सध्या आदिवासी महिलांबरोबर आदिवासी मुलांनी देखील कॉम्पुटरचा लघु उद्योग सुरु केला आहे. यावेळी पुष्पा गजरे, छबुबाई उगले , कुंदा लोहकुरे, कोमल वैद्य आदी माहिलांनी अनुभव यावेळी सांगिते.

-प्रज्ञा दिवेकर