Thu, Apr 25, 2019 11:40होमपेज › Pune › पुणे : रिक्षावर झाड कोसळले; जिवित हानी नाही (Video)

पुणे : रिक्षावर झाड कोसळले; जिवित हानी नाही (Video)

Published On: Feb 01 2018 5:43PM | Last Updated: Feb 01 2018 5:43PMपुणे : प्रतिनिधी 

शहरातील मित्रमंडळ चौकातील नेताजी पालकर रिक्षा स्टँडवर झाड कोसळले. यामध्ये स्टँडवर उभ्या असलेल्या रिक्षावर झाड पडले. आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अर्धवट कापून ठेवलेल्या गुलमोहराचे झाड रिक्षावर पडल्याने रिक्षाचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही.