Tue, Jan 22, 2019 08:31होमपेज › Pune › माल वाहतूकदारांच्या चक्‍काजामला पिंपरीत प्रतिसादप ट्रान्सपोर्टनगरी ठप्प

माल वाहतूकदारांच्या चक्‍काजामला पिंपरीत प्रतिसादप ट्रान्सपोर्टनगरी ठप्प

Published On: Jul 21 2018 1:32AM | Last Updated: Jul 20 2018 10:55PMपिंपरी : प्रतिनिधी

देशभरात डिझेलचा दर एकच असावा, भारत  टोलमुक्त व्हावा,  यासह  इतर मागण्यांसाठी माल वाहतूकदार संघटनांनी शुक्रवारपासून अनिश्चित काळासाठी देशव्यापी चक्काजाम आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे एरवी गजबजलेली निगडी येथील ट्रान्सपोर्टनगरी ठप्प झाल्याचे चित्र दिसून आले. ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांनी यावेळी परिसरात फेरीही काढली होती.

माल वाहतूकदारांच्या चक्का जाम मध्ये ट्रान्सपोर्ट नगरीतील 550 हून अधिक ट्रान्सपोर्ट व्यावसायिक सहभागी झाले होते. असोसिएशन ऑफ ट्रान्सपोर्ट पुणे, पिंपरी -चिंचवडचे अध्यक्ष अमित बाबासाहेब धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली निगडी परिसरात रॅली काढली होती. रॅलीत कार्याध्यक्ष प्रमोद भावसार, अशोक काळे आदी सहभागी झाले होते. महाराष्ट्र मजदूर कामगार संघटनेचे इरफान सय्यद यांच्या नेतृत्वाखाली माल वाहतूकदारांच्या चक्का जामला पाठिंबा दिला.  त्यामुळे लोअडिंग बंद होते. स्कूल बसही बर्‍यापैकी बंद असल्याने पालक व विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली.

महापालिकेने अतिक्रमणे हटवली

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आज ‘ग’ व ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत डांगे चौक ते भूमकर चौक रस्ता परिसरात अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली.या कारवाईत 19 हातगाड्या, 3 टपर्‍या, लोखंडी फ्रेम झोपाळा-स्टील काउंटर, जाहिरात कमान, प्लास्टिक कॅरेट आदी साहित्य जप्त करण्यात आले.सदर कारवाईसह शहर अभियंता, कार्यकारी अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली 4 कार्यालयीन अधीक्षक, 6 मुख्य लिपिक, 10 मनपा पोलिस, 45 मनपा मजूर, 1 क्रेन, 5 डंपर, 1-जे.सी.बी च्या सहाय्याने करण्यात आली.