Sun, Mar 24, 2019 08:24होमपेज › Pune › विमाननगरमध्ये ट्रान्सफॉर्मरची पाहणी

विमाननगरमध्ये ट्रान्सफॉर्मरची पाहणी

Published On: May 18 2018 1:32AM | Last Updated: May 18 2018 12:32AMयेरवडा : वार्ताहर

शहरासह उपनगरातील महावितरणच्या ट्रान्सफॉर्मर तसेच डीपीच्या दुरवस्था दाखविणारे  पान दै.‘पुढारी’ ने प्रसिध्द केले होते. याची तातडीने महावितरण कंपनी व लुंकड रियाल्टी घेऊन विमाननगर भागातील संपूर्ण ट्रान्सफॉर्मरची पाहणी करून स्वच्छता केली. 

वडगावशेरी मतदार संघातील सर्वच ट्रान्सफार्मर व डीपी सुरक्षितेच्या दृष्टीने धोकादायक असल्याचेचित्र दै.‘पुढारी’ने प्रसिध्द केले होते. याची तातडीने दखल घेवून  विमाननगर भागातील ट्रान्सफार्मर व सभोवतालची स्वच्छता महावितरण व लुंकड रियाल्टीच्यावतीने करण्यात आली. यासाठी आज गुरूवारच्या दिवशी या भागातील विद्युत पुरवठा खंडित करून सुमारे दहा हून अधिक ट्रान्सफार्मर स्वच्छ करण्यात आले. या कामी राहुल दागलिया, संदीप गुरव, असिफ अहमद, जोएब सय्यद यासह कर्मचारी सहभागी झाले होते.