Mon, Aug 19, 2019 14:05होमपेज › Pune › ‘ट्रान्सफॉर्मर’ बनले धोकादायक

‘ट्रान्सफॉर्मर’ बनले धोकादायक

Published On: May 16 2018 1:39AM | Last Updated: May 16 2018 12:56AMपुणे : प्रतिनिधी

शहरता ‘प्रकाश’ पाडणार्‍या वीज वितरण कंपनीच्या टान्सफॉर्मरमुळे मागील काही दिवसांमध्ये दोन मोठे अपघात झाले आहेत. यात खराडी येथे दोन चिमुरडे गंभीररीत्या जखमी झाले. तर पिंपरी येथे दोन चिमुकले गंभीररीत्या  भाजले. तरीही महावितरण प्रशासनाला या घटनेचे गांर्भिय नसल्याचे दै. ‘पुढारी’ने केलेल्या पाहणीतून समोर येत आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून रहिवासी इमारतीपासून दहा फुटांपेक्षा अधिक अंतरावर टान्सफॉर्मर बसवण्याची परवानगी देण्याचा कायदा असल तरी शहरातील विविध भागात मात्र इमारती, उद्याने, पदपथ, चौक, रस्त्यावरील वसाहतींना अगदी चिकटून ही टान्सफॉर्मर उभी करण्यात आली आहेत. स्वत:चाच कायदा बासनात बांधून ठेवलेली वितरण कंपनी सोडाच पण महापालिकेच्या बांधकाम विभागाचेही याकडे दुर्लक्ष होत आहे.

सिंहगड रोड, कात्रज, कोंढवा, येरवडा, हडपसर, खडकवासला, धनकवडी, कोथरूड, वारजे, खडकी या परिसरात धोकादायक टान्सफॉर्मर आहेत. या टान्सफॉर्मरची योग्य त्या पद्धतीने देखरेख करण्याचे काम महावितरणकडे असते. मात्र, वर्षानुवर्षे याची स्वच्छता व मेंटेनन्स केले जात नसल्याने वारंवार वीज गायब होण्याचे प्रकार घडतात. यामुळे मोठे अपघात होण्याचीही भीती असते. अनेक भागातील टान्सफॉर्मर संरक्षक जाळी अथवा गेट नाही. याबाबत मनपा अधिकारी आणि वीज वितरण अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता या विषयी एकमेकांकडे बोट दाखविण्याचा प्रकार सुरू आहे.  

ऑइल तपासणीकडे कानाडोळा

हाय व्होल्टेज विजेच्या दाबावर नियंत्रण करण्याचे काम ट्रान्सफार्मर मधील ऑइलचे असते. सर्व इलेक्ट्रिक उपकरणांना नियंत्रित ठेवण्याचे काम ऑइल करत असल्याने हा रोहित्रांतील महत्त्वाचा घटक आहे. त्यासाठी दर तीन महिन्यांनी त्याची ब्रेक डाऊन व्हॅल्यू (बी. डी. व्हॅल्यू) तसेच ऑइलची पातळी तपासणे महत्त्वाचे आहे. याकडे कानाडोळा केला जातो. असल्याने गरम झालेले ऑइल ट्रान्सफार्मरमधून बाहेर पडून पेट घेते. त्यातूनच अपघातले आहेत.

नियमित देखरेख होते का?

नियमित मेंटेनन्सकडे लक्ष दिले जाते. ऑइलची बी.डी. व्हॅल्यूदेखील तपासली जाते. काही ठिकाणी होत नसेल तर त्याची माहिती घेऊन त्यावर तत्काळ कार्यवाही करावी लागेल.