Mon, Apr 22, 2019 15:41होमपेज › Pune › राज्यातील १२ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्यातील १२ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

Published On: Feb 03 2018 8:51PM | Last Updated: Feb 03 2018 8:51PMपुणे: प्रतिनिधी 

राज्य सरकारने आज १२ सनदी अधिका-यांच्या बदल्या केल्या आहेत. वित्त विभागातील प्रधान सचिव विजय गौतम यांची बदली पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे सचिव म्हणून करण्यात आली आहे.

औरंगाबादचे विभागीय आयुक्त पुरूषोत्तम भापकर यांची कृषी आणि कृषी विकास विभागाच्या सचिव पदावर बदली करण्यात आली आहे. राज्याचे क्रिडा आयुक्त एस. एन. केंद्रेकर यांची औरंगाबादचे विभागीय आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. एच. कुलकर्णी यांची बदली आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे येथे बदली करण्यात आली आहे.

एम. जी. गुरसल यांची बदली शुल्क विनियामक प्राधिकरणात करण्यात आली आहे. तर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे उपमुख्य व्यवस्थापकीय संचालक अजय गुल्हाणे यांची बदली वर्धा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून करण्यात आली आहे. सिंधुदूर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून श्रीमती के. मंजूलक्ष्मी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीमती निमा अरोरा यांची बदली जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून करण्यात आली आहे. भंडारा येथील सह जिल्हाधिकारी बी. पी .पृथ्वीराज यांची बदली परभणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर करण्यात आली आहे. नाशिक येथील प्रकल्प अधिकारी आणि सह जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची बदली बीड येथे करण्यात आली आहे. अमरावती येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मनिषा खत्री यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गडचिरोली येथील सह जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिकारी सचिन ओंबासे यांची बदली अहेरी येथून गडचिरोली येथे त्याच पदावर करण्यात आली आहे.