Sun, Jul 21, 2019 16:15
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › प्लास्टिकबंदीविरोधात व्यापार्‍यांचा आज बंद

प्लास्टिकबंदीविरोधात व्यापार्‍यांचा आज बंद

Published On: Jun 25 2018 1:51AM | Last Updated: Jun 25 2018 1:04AMपुणे : प्रतिनिधी

शहरातील काही व्यापार्‍यांवर शनिवारी प्लास्टिकबंदीची बेकायदेशीर कारवाई केल्याने सोमवारी या कारवाईविरोधात एक दिवसाचे लाक्षणिक बंद आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी दिली. 

ग्राहकांची गरज लक्षात घेऊन व्यापार्‍यांनी रविवारी दुकाने सुरूच ठेवली होती. यापुढे पुन्हा अशी बेकायदेशीर कारवाई होत राहिल्यास बेमुदत बंदचा  इशारा व्यापार्‍यांनी दिला. प्लास्टिकबंदीसंदर्भातील कारवाईविरोधात शहरातील सर्व व्यापारी संघटनांच्या बैठकीत बंदचा निर्णय घेण्यात आला. बैठकीला सुमारे 450 व्यापारी उपस्थित होते. सोमवारी लाक्षणिक बंदच्या वेळी महापालिका प्रशासनाची भेट घेऊन चर्चा केली जाणार आहे. त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास व्यापारी बेमुदत बंद आंदोलन करतील, असेही निवंगुणे यांनी सांगितले.