Sat, Jul 20, 2019 14:58होमपेज › Pune › आजच्या संगीतात ‘रिमिक्स’चे प्रदूषण

आजच्या संगीतात ‘रिमिक्स’चे प्रदूषण

Published On: Dec 15 2017 2:46AM | Last Updated: Dec 15 2017 12:13AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी 

सध्या ‘रिमिक्स’चा जमाना आहे. झटपट प्रसिद्धी मिळवण्याच्या मागे तरुण पिढी लागली आहे. पूर्वी केलेली संगीताची साधना आता हरवली आहे, अशा शब्दांत पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरासिया यांनी गत काळातील आठवणी जागवल्या. सध्या सुरू असलेल्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या दरम्यान त्यांनी मध्यमासोबत संवाद साधला.

आपण खूप आधुनिक आहोत असे भासवले जात आहे. मात्र घाणेरडी हवा आल्याने वातावरण प्रदूषित होते तसे आज संगीतात काहीसे झाले आहे. मुलांचा मेंदू आणि विचार करण्याची क्षमता लुप्त तर होणार नाही अशी भीती वाटते. मुलांना एकदा सांगितले की लक्षात यायचे पण, आता त्यांच्या मेंदूत काहीच शिरत नाही. यावेळी त्यांनी आणि पंडित शिवकुमार शर्मा यांच्यासोबतचे मैत्रीपर्व उलगडले. 1954 पासून सुरू झालेली ही मैत्रीकधी संपेल माहीत नाही..जेव्हा कधी भेटतो तेव्हा भांडणालाच सुरूवात होते..लगता है हम दोनो एकही पेटसे बाहर आए है, एकदम ‘जुडवॉँ’....अशा शब्दांत त्यांनी गेल्या सहा दशकांहून असलेल्या ‘शिव-हरी’ नात्याबद्दल भाष्य केले. चांगले विषय मिळाले तर परत सुरुवात करू,’ असेही ते म्हणाले.

झटपट पैसे मिळावे अशी लालच अनेकांनाअसते. आम्हाला पण आहे. काम करीत आहोत नव्या पिढीला काय देत आहोत, काय संदेश देत आहोत हे महत्वाचे आहे, असा विचार त्यांनी मांडला. कोणत्याही देशातील व्यक्ती देखील माणसेच असतात, संगीत पण तसेच आहे. शास्त्रीय संगीताव्यतिरिक्त जे आधुनिक, व्यावसायिक आणि बॉलिवूड संगीत आहे ते लोकांच्या आत्म्यामध्ये  आहे. नेहमी लोक ही गाणी गुणगुणत असतात. मग का त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचून त्यांचे आशिर्वाद घेऊ नयेत? आपल्यावर देवाची कृपा झाली. नशीबानेही साथ दिली असल्याचेही ते म्हणाले. 

सध्याच्या पिढीला फक्त पैसे  मिळवायचे

‘शिव-हरी’ यांचे संगीत पुन्हा ऐकायला मिळणार का? असे विचारले असता पंडितजींनी तत्काळ होकार दिला. आत्ताच्या चित्रपटात पिढीला साधे डायलॉग व्यवस्थित म्हणता येत नाहीत. इंग्रजीचा वापर वाढला आहे. फक्त त्यांना पैसे मिळवायचे आहेत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.