Mon, May 27, 2019 08:56होमपेज › Pune › ‘आरटीई’ संदर्भात आज कोर्टाचा निर्णय

‘आरटीई’ संदर्भात आज कोर्टाचा निर्णय

Published On: Apr 18 2018 1:41AM | Last Updated: Apr 18 2018 12:02AMपिंपरी : प्रतिनिधी

मोफत शिक्षण हक्क (आरटीई) कायद्याअंतर्गत प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांचे गेल्या पाच वर्षांपासूनचा परतावा शासनाकडे थकला आहे. याबाबत  काही शाळांनी कोर्टामध्ये धाव घेतली आहे.    जोपर्यंत कोर्टाचा निर्णय येत नाही तोपर्यंत आरटीईच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देणार नाही असा पवित्रा शाळांनी घेतला आहे. आज (बुधवार) औरंगाबाद खंडपीठ प्रवेश रखडविणार्‍या शाळांबाबत काय निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

कोर्टाने दोन वेळा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. पुन्हा असे होऊ नये याची चिंता पालकांना लागून राहिली आहे. परताव्या अभावी आरटीई प्रवेश रखडविणार्‍या खासगी शाळांनी औरंगाबाद येथील खंडपीठात धाव घेतली आहे.  जोपर्यंत खंडपीठाचा निर्णय येत नाही तोपर्यंत शाळांनी प्रवेशप्रक्रिया बंद ठेवली आहे. ज्या पालकांच्या पाल्याचे प्रवेश पहिल्या फेरीत झालेले नाहीत त्यांना आता पहिल्या फेरीतील प्रवेश आबादित राहतो की नाही ही काळजी वाटत आहे. 

पिंपरी -चिंचवड शहरात आरटीईच्या 3155 जागा उपलब्ध आहेत. त्यापैकी आरटीई प्रवेशाच्या पहिल्या फेरीमध्ये अत्तापर्यंत फक्त 1320 जागांवर  विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. शाळांच्या मनमानी कारभारामुळे बरेचसे विद्यार्थी अद्याप प्रवेशापासून वंचित आहेत. प्रवेशासाठी दुसरी फेरी लॉटरी सोडत 18 व 19 एप्रिल रोजी काढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, पिंपरी -चिंचवड विभागास अद्याप तशा प्रकारची सूचना आली नसल्याचे प्रशासन अधिकारी बी.एस.आवारी यांनी सांगितले आहे. तर दुसरी फेरी सुरु केल्यास पहिल्या फेरीतील प्रवेश नाकारणार्‍या विद्यार्थ्यांचे काय यावर शाळांना पहिल्या फेरीतील विद्यार्थ्यांच्या रिक्त जागा ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत असे शिक्षण उपसंचालक शरद गोसावी यांनी सांगितले. 

Tags : Pimpri, Todays, decision,  relation,  RTE