होमपेज › Pune › फेरीवाल्यांची आज राज्यस्तरीय परिषद

फेरीवाल्यांची आज राज्यस्तरीय परिषद

Published On: Dec 15 2017 2:45AM | Last Updated: Dec 15 2017 1:02AM

बुकमार्क करा

पिंपरी :

नॅशनल हॉकर्स फेडरशन इंडिया आणि महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे शुक्रवारी (दि. 15) सकाळी 10 वाजता राज्यस्तरीय फेरीवाला परिषदेचे आयोजन केले आहे. आकुर्डी येथील बजाज ऑटोसमोरील श्रमशक्ती भवन येथे ही परिषद होणार असल्याची माहिती फेरीवाला महासंघाचे अध्यक्ष काशीनाथ नखाते यांनी दिली.

या परिषदेस देशभरातील व राज्यातील प्रमुख मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. यात  राष्ट्रीय महासचिव शक्तिमान घोष व महापौर नितीन काळजे, इनयात अली, राष्ट्रीय महिला अध्यक्षा अनिता दास, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाचे अध्यक्ष काशीनाथ नखाते, उदय चौधरी आदींसह नागपूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, अमरावती, नाशिक, जालना, औरंगाबादसह विविध ठिकाणचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

फेडरेशन व महासंघातर्फे दरवर्षी या परिषदेचे आयोजन केले जात असून, यापूर्वी  मेधाताई पाटकर, काँ. गोविंद पानसरे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले आहे. फेरीवाला महिलांना  देशभरात स्थान मिळावे; तसेच पथ विक्रेता कायद्याची अंमलबजावणी राज्यात करण्याकामी उपाययोजना व सामाजिक सुरक्षा हे मुद्दे असणार आहे.