Sat, Apr 20, 2019 07:53होमपेज › Pune › सणसवाडी येथे दंगल पीडितांची आज बैठक

सणसवाडी येथे दंगल पीडितांची आज बैठक

Published On: Jan 05 2018 1:23AM | Last Updated: Jan 05 2018 12:47AM

बुकमार्क करा
सणसवाडी : वार्ताहर 

कोरेगाव भीमा व सणसवाडी येथे 1 जानेवारी रोजी काही समाजकंटकांनी दंगल घडून आणली. यात कोरेगाव व सणसवाडी येथील स्थानिकांच्या मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर सणसवाडी येथे शिवम लॉन्समध्ये शुक्रवारी (दि. 5) सकाळी 10 वाजता सणसवाडी, कोरेगाव भीमा, वढू, शिक्रापूर, पेरणे आदी गावांसह सर्व समाजातील कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली आहे.
 स्थानिक मालमतेच्या व स्वरक्षणासाठी एकत्र आल्याने मोठे नुकसान होण्याचे टळले आहे, परंतु पोलिस प्रशासनाने दंगलीच्या दिवशी बघ्याची भूमिका घेतली. प्रशासनने दंगेखोरांवर व निष्क्रिय पोलिसांवर कारवाई करायची सोडून पोलिस चुकीच्या पद्धतीने दडपशाही करू पाहत आहेत. याबाबत पंचक्रोशीत प्रचंड संताप आहे. 

याबाबत अठरापगड समाजातील दंगल पीडित ग्रामस्थांची बैठक आयोजित केली असून त्यात पीडितांनी  नुकसानीबाबत लिखित अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.  शिवप्रहार संघटना महाराष्ट्र अध्यक्ष संजीव भोर, सणसवाडी सरपंच रमेश सातपुते, पंचायत समिती उपसभापती मोनिकाताई हरगुडे, बाजार समिती संचालक दत्ताभाऊ हरगुडे, माजी सरपंच वर्षाताई कानडे, माजी सरपंच नवनाथ हरगुडे, उपसरपंच राहुल दरेकर, माजी उपसरपंच बाबासोा दरेकर, तंटामुक्ती अध्यक्ष वैभव यादव, पंडित आप्पा दरेकर, सोमनाथ दरेकर, अशोक दरेकर, विद्याधर दरेकर, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे चेअरमन गोरक्ष दरेकर, शिवप्रहारचे तुषर काकडे, धनाजी जाधव, अनिल बोटे पाटील, गुलाबराव गायकवाड, सर्व ग्रामपंचायत सदस्य, विविध संघटना,  एकत्रित येवून शुक्रवारी बैठक घेण्याचे निश्‍चित केले.