Sun, Mar 24, 2019 06:36होमपेज › Pune › छगन भुजबळ समर्थकांची आज बैठक

छगन भुजबळ समर्थकांची आज बैठक

Published On: Feb 15 2018 1:58AM | Last Updated: Feb 14 2018 10:43PMपिंपरी : प्रतिनिधी

गेल्या 22 महिन्यांपासून कारागृहात असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना जामीन मिळत नसल्याने त्यांच्या समर्थकांनी राज्यभरात बैठका आयोजित करून भुजबळांवर होत असलेल्या अन्यायास तोंड फोडायचे ठरविले आहे. पिंपरी-चिंचवडमधील भुजबळ समर्थक  येत्या गुरुवारी दि. (15) भोसरीत  बैठक घेऊन चर्चा करणार आहेत.

भुजबळ यांच्यावर होणार्‍या अन्यायाच्या निषेधार्थ शहरातील प्रत्येक प्रभागात; तसेच ग्रामीण भागात गल्लीगल्लीत भुजबळ समर्थक जोडो अभियान राबवीत आहेत. येत्या गुरुवारी (दि.15) सायंकाळी साडे चार वाजता भोसरीतील दीप लॉन्स मंगल कार्यालयात बैठक होणार आहे. भुजबळ यांच्यावर होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ अधिवेशन काळात मुंबईत पाच लाख समर्थकांचा मोर्चा काढण्याचा निर्धार अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने केला आहे.

या मोर्चाची  तयारी राज्यभरात सुरू आहे. या मोर्चाबबत बैठकीत चर्चा केली जाणार आहे.  याबाबत बैठकीचे आयोजक माजी नगरसेवक वसंत लोंढे म्हणाले, भुजबळ यांच्यावर सरकार सूडबुद्धीने कारवाई करत आहे. 22 महिन्यांपासून त्यांना गुन्हा सिद्ध झाला नसताना देखील जेलमध्ये ठेवले आहे.

सर्व चौकशी होऊनही त्यांना जामीन दिला जात नाही.  बैठकीत मुंबईत काढल्या जाणार्‍या मोर्चाचे नियोजन केले जाणार आहे. या बैठकीला शहरातील भुजबळ प्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन लोंढे यांनी केले आहे.