Thu, Apr 18, 2019 16:02होमपेज › Pune › खडसे वाचावेत याच हेतूने एसीबीचा गुन्ह्याचा तपास

खडसे वाचावेत याच हेतूने एसीबीचा गुन्ह्याचा तपास

Published On: May 18 2018 1:31AM | Last Updated: May 18 2018 1:24AMपुणे : प्रतिनिधी 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाडून (एसीबी) माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या विरोधात क समरी अहवाल दाखल केल्यानंतर अहवालामध्ये एसीबीने खडसे वाचावेत या हेतूनेच तपास केल्याचा आरोप गुन्ह्यातील मुख्य तक्रारदार हेमंत गवंडे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. अहवालाच्या निष्कर्षात जमीन खरेदीचा हेतू, त्यासाठीची खडसेंची पूर्वतयारी, पदाचा केलेला गैरवापर अशा अनेक गोष्टींकडे एसीबीने सोयीस्कर कानाडोळा केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. तसेच खडसेंना याप्रकरणातून मुक्त करणे हा एकच हेतू ठेऊन सदरील तपास अहवाल सादर झालेला आहे.

गवंडे म्हणाले, या प्रकरणामध्ये खडसेंच्या विरोधात एसीबीने क समरी सादर केल्याचे समजले. अहवालात एमआयडीसीतील जमिनीचा व्यवहार हा कोणत्याही कायद्याचे उलंघन न करता झालेला आहे, असे एसीबीने नमूद केले आहे, याला गवंडे यांनी आक्षेप नोंदविला असून हे परस्पर विरोधाभास दर्शवत असल्याचे म्हटले आहे.  अहवालामध्ये नमूद केल्याप्रमाणे बेंचमार्क या कंपनीकडून 4 कोटी विनातारण कर्ज घेतले आहे, असे दिसून येते. वास्तविक पाहता सदरील कंपनी ही स्वतः कर्ज घेऊन तिसर्‍या व्यक्‍तीला कर्ज कसे काय देते, असा प्रश्‍नही उपस्थित केला आहे. तसेच एप्रिल 2016 मध्ये बैठक घेण्याापूर्वी खडसे यांना त्यांची पत्नी व जावई बैठकीच्या संबंधीत मिळकतीची खरेदी करणार आहेत हे माहीत नव्हते म्हणजे म्हणजे निव्वळ हास्यापद असल्याचे गवंडे म्हणाले. खरेदीखताच्या सूची क्रमांक 2 मध्ये दुय्यम निबंधकाच्या नजर चुकीमुळे तसेच कामाच्या गडबडीमुळे मिळकतीची खरे बाजारमूल्य नमूद केले गेले नाही.

ही बाब सुद्धा विश्वास पात्र नाही. तसेच एसीबीने मान्य केल्याप्रमाणे सदरील मिळकतीचा ताबा हा गेली 40 वर्षांपासून एमआयडीसीकडे आहे व त्याची विक्री ही चांगल्या किमतीस होणार नाही, तर मग खडसे याच्या कुटुंबीयांचा सदरील खरेदीमागचा हेतू, उद्देश काय ही बाब एसीबीने पूर्णपणे दुर्लक्षित ठेवल्याचा आरोप गवंडे यांनी केला. महसूल खात्याचे मंत्री असताना सदरील रेकॉर्डबाबतची माहिती गोपनीय ठेवणे आणि त्यामध्ये काही चूक असल्यास सरकारच्या निर्देशनास आणून देणे ही महसूल मंत्री म्हणून खडसेंवर जबाबदारी होती. मात्र तसे न करता सदरील माहितीचा फायदा घेऊन खडसेंनी स्वतःच्या कुटुंबीयांच्या नावे सदरील जमिनीची खरेदी केली व सरकारच्या विश्वासघात करून स्वतःच्या जबाबदारीशी देखील प्रतारणा केल्याचा आरोप गवंडे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केला आहे.