Sat, Apr 20, 2019 17:52होमपेज › Pune › तीन हजार विद्यार्थ्यांना स्वच्छता शपथ

तीन हजार विद्यार्थ्यांना स्वच्छता शपथ

Published On: Jan 16 2018 2:07AM | Last Updated: Jan 16 2018 1:52AM

बुकमार्क करा
पिंपरी : प्रतिनिधी 

स्वच्छ भारत अभियानांतर्गत  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पर्यावरणसंवर्धन समितीच्या सहकार्याने स्वच्छता जनजागृतीसाठी सामूहिक स्वच्छता शपथ उपक्रम घेण्यात आला. यमुनानगर, निगडी येथील  शिवभूमी विद्यालयात झालेल्या कार्यक्रमात आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी तब्बल 3 हजार 100 विद्यार्थ्यांना स्वच्छतेबाबत शपथ दिली. 

या वेळी महापालिकेचे सह आयुक्त दिलीप गावडे, आरोग्य कार्यकारी अधिकारी मनोज लोणकर, शिवभूमी विद्यालय सहसचिव संग्राम कोंडे, मुख्याध्यापक भगवान शिंगाडे, समितीचे अध्यक्ष विकास पाटील, सोनाली कुंजीर, क्षेत्रीय अधिकारी योगेश कडूसकर,  सहा आरोग्याधिकारी धाकोजी शिर्के, शिक्षक व स्वयंसेवक उपस्थित होते. 

यावेळी संग्राम कोंडे यांनी स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबवीत असलेल्या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले. शिवभूमी विद्यालयातील सर्व विद्यार्थी अभियानामध्ये सहभागी होऊन श्रमदान करतील, असे त्यांनी स्पष्ट केले. प्रभाकर मेरूकर यांनी सूत्रसंचालन केले. सुनंदा कोंडे यांनी आभार मानले. 

दरम्यान, मराठा मित्रमंडळाच्या काळेवाडी येथील माध्यमिक विद्यालयात सह आयुक्त दिलीप गावडे यांनी दोन हजार विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ दिली. विद्यार्थ्याने स्वत:च्या घरातील स्वच्छ व सुके प्लास्टिक शाळेत जमा केले. या वेळी  मुख्याध्यापिका व्ही. एस.  काळजे, मुख्याध्यापिका ए. आर. वाल्हेकर, पर्यावरण शिक्षक एल. एस. रासकर,  व्ही. एस. साठे, सहायक आरोग्य  अधिकारी गणेश देशपांडे, संजय कुलकर्णी, मदन जोशी, सुभाष चव्हाण, विनय मोने, अनिल दिवाकर, विकास आमले उपस्थित होते. दत्तात्रय कुमठेकर यांनी सूत्रसंचालन केले.