Fri, Apr 26, 2019 18:07होमपेज › Pune › तीन तलाक कायद्यात हस्तक्षेप होऊ देणार नाही : मौलाना अतहर 

तीन तलाक कायद्यात हस्तक्षेप होऊ देणार नाही : मौलाना अतहर 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी

केंद्र सरकार तीन तलाकच्या कायद्यात हस्तक्षेप करीत आहे. काही ठराविक मुस्लिम महिलांना हाताशी धरून गैरफायदा घेत आहे. सरकारचा या कायद्यात हस्तक्षेप होऊ देणार नाही, असा इशारा मुंबईमधील मोहम्मदीया मशिदचे मौलाना अतहर यांनी दिला. मुंबईमध्ये या बाबत दोन लाख समाज बांधवांनी मोर्चा काढून याला विरोध असल्याचे या वेळी त्यांनी नमूद केले.

तीन तलाक बिलला विरोध होत असून, मुस्लिम महिला या विधेयकाविरोधात देशभर निषेध करीत आहेत. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या वतीने केलेल्या आव्हानाला संपूर्ण देशातून प्रतिसाद मिळत आहे. कुल जमाती तंजीम पिंपरी-चिंचवडच्या वतीने महारॅली काढून या कायद्याचा निषेध करण्यात आला. या रॅलीला मुस्लिम महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी महिलांनी ‘मेरी इज्जत मेरी जान, मेरा दीन मेरा इमान’ आदी  घोषणा दिल्या. दुपारी तीन वाजता मिलिंद नगर, पिंपरी येथील लतीफिया मस्जिद येथून रॅलीचा प्रारंभ  झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ रॅलीचे सभेत रुपांतर झाले. 

नाजीमा आपा शेख म्हणाल्या, आम्हाला इस्लाममधील कायदाच मान्य आहे. विद्यमान सरकारने केलेला कायदा आम्हाला मान्य नाही. हा कायदा क्रिमिनल आहे. इस्लाम ही परिपुर्ण जीवन व्यवस्था आहे. यामध्ये जीवनातील प्रत्येक क्षेत्रात जगण्याचा आदर्श दिला आहे. 

मौलाना अलिम अन्सारी म्हणाले, केंद्र सरकारने मुस्लिम समाजातील काही महिलांना हाताशी धरून तीन तलाकचा कायदा करवून घेतला. आम्ही त्यापेक्षा अधिक महिलांना घेऊन मोर्चा काढून या कायद्याला विरोध केला. प्रत्येकाला आपल्या धर्मानुसार जगण्याचा अधिकार आहे. संविधानिक अधिकार हिरावू नये. प्रत्येक मुस्लिम स्त्रीचा याला विरोध आहे. हा कायदा स्त्रियांच्या हिताचा नसून अन्यायकारक कायदा आहे. 

 

Tags : Pimpri, Pimpri news, Three talak, laws, Muslim, morcha, तीन तलाक,  


  •