Fri, Jul 19, 2019 00:53होमपेज › Pune › तीन विद्यार्थ्यांसह चौघांचा बुडून मृत्यू

तीन विद्यार्थ्यांसह चौघांचा बुडून मृत्यू

Published On: Apr 27 2018 1:06AM | Last Updated: Apr 27 2018 12:51AMपुणे : प्रतिनिधी 

गेल्या 24 तासात पुणे जिल्ह्यात तीन शाळकरी विद्यार्थ्यांसह चौघांचा बुडून मृत्यू झाला. मुळशी तालुक्यातील कातरखडक धरणात उन्हाळी शिबिरासाठी आलेल्या चेन्नईतील विद्यार्थ्यांतील पोहण्यासाठी उतरलेले तिघे जण बुडाले; तर भोसरीतील  सहल केंद्रात महापालिकेच्या जलतरण तलावातील दुर्घटनेत सनी बाळासाहेब ढगे हा 22 वर्षीय तरुण पोहण्यासाठी आला असता बुडाला. चेन्नईतील एका विद्यार्थ्याचा मृतदेह कालच हाती आला होता. आज दोघांचे मृतदेह सापडले. 

चेन्नई येथून उन्हाळी शिबिरासाठी कातरखडक (ता. मुळशी) येथे आलेल्या तीन शाळकरी मुलांचा धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि. 25) सायंकाळी घडली होती. यातील एक मृतदेह बुधवारी रात्री तर दोन मृतदेह गुरुवारी (दि. 26) दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान मिळून आले आहेत. उन्हाळी शिबिराच्या पहिल्याच दिवशी कातरखडक तलावावर फिरण्यासाठी गेले असता तिघे जण पाण्यात पडल्याने त्यांचा मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेन्नई येथील ए.सी.एस मॅट्रिक्युलेशन शाळेचे 13 ते 15 वयोगटातील 20 विद्यार्थी कातरखडक या ठिकाणी उन्हाळी शिबिरासाठी आले होते. शिबिराचा बुधवार हा पहिलाच दिवस होता. शिबिर सायंकाळी संपल्यानंतर हे सर्व जण कातरखडक येथे असलेल्या तलावावर गेले असता तिघे जण पाण्यात उतरले असता बुडाले. डॅनिश कलिम अनसारी (वय 14, रा. 59 मेन स्ट्रीट नेताजीनगर, आयओसी, चेन्नई), संतोष गणेश (वय 14, रा.246 नवलरनगर तोडियार पेठ, चेन्नई) आणि सर्वान्ना मुरूगराजा कुमार (वय 14, रा. 915, ई लाईननगर, ए ब्लॉक स्ट्रीट, कोडूनगायर, चेन्नई) असे धरणात बुडालेल्यांची नावे आहेत. यातील डॅनिश याचा मृतदेह बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास बाहेर काढून पिरंगुट येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आला होता. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. 

दरम्यान बुधवारी रात्री अन्य दोघांचे शोधकार्य थांबवले होते. गुरुवारी सकाळी पुन्हा लवकरच शोधकार्यास सुरुवात करण्यात आली असता संतोष आणि सर्वान्ना यांचे मृतदेह दुपारी एक वाजेपर्यंत मिळून आले.
जागा असल्यामुळे जागेची निवड कातरखडक येथे चेन्नई येथून उन्हाळी शिबिरासाठी आलेल्या 20 मुलांचे आयोजन टिच फॉर इंडिया या संस्थेने केले होते. या संस्थेतील एका पदाधिकार्‍याची जमीन कातरखडक येथे असल्यामुळे कातरखडक येथील जागेची निवड या उन्हाळी शिबिरासाठी करण्यात आली असल्याची माहिती पुढे येत आहे.