Tue, May 21, 2019 22:11होमपेज › Pune › पुणे : कातरखडक धरणात तीन विद्यार्थी बुडाले 

पुणे : कातरखडक धरणात तीन विद्यार्थी बुडाले 

Published On: Apr 26 2018 7:32AM | Last Updated: Apr 26 2018 7:32AMपिंपरी : प्रतिनिधी 

चेन्नई येथून शिबिरासाठी आलेल्या तीन शाळकरी मुले बुधवारी धरणात बुडाले. एकाचा मृतदेह सापडला असून बाकीचे दोन मृतदेह अद्याप सापडलेले नाहीत.

डॅनिश राजा (वय १३) याचा मृतदेह सापडला असून संतोष के. (वय १३), सर्वान्ना (वय १३ ) असे धरणात बुडालेल्यांची नावे आहेत.  मिळालेल्या माहितीनुसार , चेन्नईतील एसीएस मॅट्रिक्युलेशन शाळेचे विद्यार्थी शिबिरासाठी मुळशीमधील कातरखडक या गावी जॅकलिन स्कुल ऑफ थॉट या ठिकाणी आलेले होते. आठ दिवस हे शिबीर होते. यासाठी १३-१५ वयोगटातील २० विद्यार्थी याठिकाणी आलेले होते. त्यांच्यासोबत एक शिक्षक तर तीन शिक्षिका असे चार जण सोबत आलेले आहेत. 

बुधवारी कातरखडक या धरणावर सर्वजण फिरायला गेले. त्यावेळी तिघेजण पाण्यात उतरले असता त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही आणि ते बुडाले. घटनेची माहिती समजताच गावातील मंडळी तसेच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि शोध मोहिम सुरु केली. पौड पोलिस, अग्निशामकचे जवान, जीव रक्षक व नागरिकांच्या मदतीने शोध घेत आहेत.